खळबळजनक! विरारमध्ये इमारतीचा सुरक्षारक्षकच निघाला भक्षक; काढली नग्नधिंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 21:45 IST2019-07-15T21:44:00+5:302019-07-15T21:45:38+5:30
संतप्त महिलांनी बेदम चोप देत त्या सुरक्षारक्षकाची नग्नधिंड काढली.

खळबळजनक! विरारमध्ये इमारतीचा सुरक्षारक्षकच निघाला भक्षक; काढली नग्नधिंड
ठळक मुद्देगैरवर्तन करत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. संतप्त महिलांनी बेदम चोप देत त्या सुरक्षारक्षकाची नग्नधिंड काढली. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी आरोपी सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
विरार - विरारमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीत राहणाऱ्या ६ वर्षाच्या चिमुरडीसोबत सुरक्षारक्षकाने गैरवर्तन केले. याबाबत इमारतीतील लोकांना समजताच आणि सीसीटीव्हीद्वारे सुरक्षरक्षकाचे गैरवर्तन उघड होताच संतप्त महिलांनी बेदम चोप देत त्या सुरक्षारक्षकाची नग्नधिंड काढली. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी आरोपी सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ६ वर्षाची चिमुकली घराकडे जात असताना इमारतीच्या जिन्यावर नराधम सुरक्षारक्षक तिच्याशी गैरवर्तन करत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले.