अलिबागमध्ये छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसाय; दोघांना अटक, पीडितेची मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:50 IST2025-06-24T18:50:07+5:302025-06-24T18:50:56+5:30

वरसोली येथील लोट्स लॉजिंगवर अवैधरीत्या देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना सोमवारी संध्याकाळी गोपनीय सुत्रांकडून मिळाली होती.

Secret prostitution business in Alibaug; Two arrested, victim released | अलिबागमध्ये छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसाय; दोघांना अटक, पीडितेची मुक्तता

अलिबागमध्ये छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसाय; दोघांना अटक, पीडितेची मुक्तता

काही महिन्यांपूर्वी अलिबाग शहरात वेश्या व्यावसाय करणाऱ्या नवरा-बायकोला अटक केल्यानंतर आज पुन्हा वरसोली येथील लोट्स लॉजिंग येथे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अलिबाग पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, वेश्या व्यवसायासाठी असलेल्या पीडितेला पोलिसांनी ताब्यात घेत महिला सुधारगृहात पाठवले आहे.
 
वरसोली येथील लोट्स लॉजिंगवर अवैधरीत्या देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना सोमवारी संध्याकाळी गोपनीय सुत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार एक पथक तयार करीत ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस उपनिरीक्षक दिपक मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक सत्यभामा खरात, पोलीस हवालदार जयेंद्र पाटील, परेश म्हात्रे, महिला पोलीस हवालदार मयुरी जाधव, पो.शिपाई शुभम नांदगावकर, अनिकेत पाटील, अनिकेत ढिवरे, सुनिल जाधव यांचे पथक तयार करण्यात  होते. कारवाईसाठी दोन महिलांना पंच म्हणून पाचारण करण्यात आले होते. 

एक बनावट ग्राहक तयार करून देह विक्रीचा व्यवसाय चालू असल्याची खात्री करून, खात्री झाल्यास पोलीसांना सांकेतिक इशारा दिला. त्यानंतर तात्काळ पोलीस पथकाने धाड मारून तेथे वेश्या व्यवसायासाठी आलेल्या पीडित मुलीला मुक्त केले. यामध्ये राजेश रामलखन चौपाल व जोत्स्ना दास यांचे विरोधात पोलीस शिपाई अनिकेत ढिवरे यांनी फिर्याद दाखल केली होती.
 
या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अलिबाग पोलीस ठाण्यात यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४३,३ (५) सह अनैतिक व्यापारास प्रतिबंधक अधिनीयम १९५६ चे कलम ३,४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, यांचे मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे व त्यांच्या टिमने यशस्वी केली आहे.

Web Title: Secret prostitution business in Alibaug; Two arrested, victim released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.