गोळीबारात भंगार व्यावसायिक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 21:15 IST2018-08-04T21:14:09+5:302018-08-04T21:15:34+5:30
असलम खान असे जखमी भंगारच्या व्यावसायिकाचे नाव

गोळीबारात भंगार व्यावसायिक गंभीर जखमी
मुंबई - हल्लेखोरांने गोळीबार केल्याने भंगारचा व्यापारी गंभीर जखमी झाला. ही घटना अंधेरीतील मरोळ परिसरात शुक्रवारी रात्री घडली. असलम खान असे जखमी भंगारच्या व्यावसायिकाचे नाव आहे.
मरोळ येथील व्यापारी असलम खान हे शुक्रवारी मध्यरात्री आपल्या एमएच ०२, सीडब्लू ९९९६ या मर्सीडीजने घरी परतत होते. खान हे जॉर्ज अपार्टमेंटमध्ये राहतात. यावेळी घराच्या बाहेर उभे असताना मास्क लाऊन आलेल्या हल्लेखोराने असलम यांच्यावर गोळीबार केला. यावेळी त्यांच्या पोटात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यवर गोळीबार करत हल्लेखोर साथीदारसह लागलीच दुचाकीवरून पसार झाला.
गोळीचा आवाज आल्याने परिसरातील नागरिक असलम यांच्या मदतीला धाऊन आले. त्यांनी असलम यांना होली स्पिरीट रुग्णालयात दाखल केले. मात्र हा हल्ला का करण्यात आले हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत सय्यद आलम मलिक (वय - ३३) यांनी पोलिसात दोन अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.