‘स्नॅपचॅट’वरील ओळख विद्यार्थिनीला महागात! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 06:26 IST2025-06-02T06:25:17+5:302025-06-02T06:26:11+5:30

संबंधित १५ वर्षीय मुलगी सायन, कोळीवाडा येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकते

Schoolgirl's Snapchat identity cost her dearly; Threat to make obscene photos, videos viral | ‘स्नॅपचॅट’वरील ओळख विद्यार्थिनीला महागात! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

‘स्नॅपचॅट’वरील ओळख विद्यार्थिनीला महागात! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘स्नॅपचॅट’वर तरुणासोबत झालेली ओळख ॲण्टॉप हिलमधील एका शालेय विद्यार्थिनीला भलतीच महागात पडली आहे. या तरुणाने तिला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठविण्यास भाग पाडले. तसेच हेच फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी संबंधित ‘स्नॅपचॅट’ खातेधारकाविरोधात ॲण्टॉप हिल पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

१५ वर्षीय मुलगी सायन, कोळीवाडा येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकते. ३० मे रोजी एका अज्ञात व्यक्तीने तिच्या वडिलांना फोन केला. ‘तुमच्या मुलीचे काही व्हिडीओ आणि फोटो माझ्याकडे आहेत. ती सध्या माझ्याशी बोलत नसून अन्य मुलांशी बोलते, त्यामुळे तिला समजावा. अन्यथा तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करेन,’ अशी धमकी त्याने दिली. त्यावर मुलीला समजवतो. तुम्ही तुमच्या मोबाइलमधील व्हिडीओ आणि फोटो डिलिट करा, अशी विनंती तिच्या वडिलांनी त्याला केली.

त्यानंतर त्याने तिच्या वडिलांना मुलीचे व्हिडीओ, फोटो व्हाॅटस्ॲपवर पाठविले. वडिलांनी मुलीकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी मुलीने तरुणाशी ‘स्नॅपचॅट’वर ओळख झाल्याचे सांगत त्याने धमकावून फोटो, व्हिडीओ पाठविण्यास भाग पाडल्याचे सांगितले. 

Web Title: Schoolgirl's Snapchat identity cost her dearly; Threat to make obscene photos, videos viral