धक्कादायक! शिक्षकाने चाकूच्या धाकावर केला शिक्षिकेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 10:41 IST2022-05-02T10:41:11+5:302022-05-02T10:41:36+5:30

सोबत ये-जा करताना झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका शिक्षकाने चाकूचा धाक दाखवून सहकारी शिक्षिकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

school teacher forced lady teacher maharashtra buldhana police arrested | धक्कादायक! शिक्षकाने चाकूच्या धाकावर केला शिक्षिकेवर बलात्कार

धक्कादायक! शिक्षकाने चाकूच्या धाकावर केला शिक्षिकेवर बलात्कार

खामगाव (जि. बुलडाणा) : सोबत ये-जा करताना झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका शिक्षकाने चाकूचा धाक दाखवून सहकारी शिक्षिकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हे दृष्कृत्य करणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करुन त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील एका काॅलनीत राहणारी ३६ वर्षीय शिक्षिका तालुक्यातील एका गावातील शाळेत कार्यरत आहे. रमाई संकुल समर्थनगर भागातील रहिवासी शिक्षक श्रीकांत गुलाबराव वानखडे (४६) हे हिंगणा-कारेगाव येथील शाळेवर कार्यरत आहेत. शिक्षिकेचे गाव त्याच रोडवर असल्याने ते दोघेही काही शिक्षकांसोबत कारने खामगाववरुन ये-जा करत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगली ओळख झाली होती.

दरम्यान, शिक्षक श्रीकांत वानखडे याने शिक्षिकेला घरी बोलाविले. आतील दार लावून घेत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिक्षिकेने नकार देत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता वानखडे याने चाकूचा धाक दाखवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याने शिक्षिकेचे आक्षेपार्ह फोटो काढून हा प्रकार कुणाला सांगितल्यास फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेन, तसेच व्हायरल करेन, अशी धमकी दिली. याबाबत पीडित शिक्षिकेने शहर ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन शिक्षक श्रीकांत गुलाबराव वानखडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

Web Title: school teacher forced lady teacher maharashtra buldhana police arrested