नर्सरीतील चिमुकलीचे शाळेतच लैंगिक शोषण, नराधम पती-पत्नीला बेड्या
By नजीर शेख | Updated: November 1, 2018 19:24 IST2018-11-01T19:23:50+5:302018-11-01T19:24:05+5:30
षडयंत्र रचत ४ आणि साडेतीन वर्षीय लहानग्या दोन विदयार्थ्यांच्या मदतीने लैंगिक शोषण केले आहे. महत्वाचे म्हणजे मावशी आणि वॉचमन हे दोघे पती - पत्नी आहेत.

नर्सरीतील चिमुकलीचे शाळेतच लैंगिक शोषण, नराधम पती-पत्नीला बेड्या
मुंबई - ठाण्यातील एका नर्सरीत शिकणाऱ्या तीन वर्ष्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चिमुकल्या मुलीला नसर्रीची मावशी आणि वॉचमन यांनी षडयंत्र रचत ४ आणि साडेतीन वर्षीय लहानग्या दोन विदयार्थ्यांच्या मदतीने लैंगिक शोषण केले आहे. महत्वाचे म्हणजे मावशी आणि वॉचमन हे दोघे पती - पत्नी आहेत.
मी उद्या शाळेत जाणार नाही, स्कुल गंदा है असं म्हणत पीडित चिमुरडी नर्सरीत जाण्यास मागत नव्हती. १ सप्टेंबर पासून पीडित चिमुकलीच्या पोटात दुखत होते. पालकांना शाळेत मुलांनी मस्ती करतेवेळी पोटावर मारले असेल असा समाज होता. डॉक्टरांकडून उपचार देखील सुरु होते. मात्र, नंतर पीडित मुलीने पालकांना घटना सांगितली. त्या मुलीच्याच वर्गात असणाऱ्या दोन लहान मुलांच्या मदतीने मावशीने चिमुकलीला बाथरूममध्ये नेले आणि दोन लहान मुलांना तिचे कपडे काढण्यास सांगून वॉचमनने दुष्कर्म केले. त्यानंतर मुलीला रक्तस्त्राव झाल्याने तिचे कपडे धुवून देण्यात आले आणि तिला जुलाब झाल्याचे सांगत मावशीने आणि शिक्षकांनी पळवाट काढली. तसेच बाथरूममध्ये वॉचमन आणि मावशीने तिला चॉकलेट अंडी आईसक्रीम देऊन घरी न सांगण्यास धमकाविले. ही धक्कादायक घटना मुलीच्या पालकांनी कोपरी पोलीस ठाण्यात जाऊन सांगितली. त्यानंतर कोपरी पोलिसांनी त्यांना बिट मार्शलसोबत नौपाडा पोलीस ठाण्यात पाठवून पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आणि नर्सरीची मावशी आणि वॉचमनला पोलिसांनी अटक केली आहे.