"ती चांगली मुलगी, तू..."; स्नॅपचॅटवर आई असल्याचं भासवून मुस्कान साहिलला करायची मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:26 IST2025-03-21T11:25:16+5:302025-03-21T11:26:41+5:30
Saurabh Rajput : साहिलच्या आईचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. तरीही, साहिलला खात्री होती की, तो त्याच्या मृत आईशी बोलू शकतो.

"ती चांगली मुलगी, तू..."; स्नॅपचॅटवर आई असल्याचं भासवून मुस्कान साहिलला करायची मेसेज
मेरठमधील भयानक सौरभ राजपूत हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांच्याबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसोबत मिळून पती सौरभची हत्या करण्याचा कट रचला होता आणि एकदा तिचा हा डाव फसला होता असं समोर आलं आहे. पण ४ मार्च रोजी तिने केवळ तिचा पती सौरभची हत्या केली नाही तर तिच्या मृतदेहाचे क्रूरपणे तुकडे केले, ड्रममध्ये ठेवले. इतक्या हुशारीने खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर, दोघेही कोणतीही चिंता न करता मनालीला फिरण्यासाठी निघून गेले.
तपासादरम्यान पोलिसांना असं आढळून आलं की, साहिल शुक्ला तंत्र-मंत्र आणि जादूटोण्यावर दृढ विश्वास ठेवत होता. साहिलच्या आईचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. तरीही, साहिलला खात्री होती की, तो त्याच्या मृत आईशी बोलू शकतो. मुस्कानला हे सर्व चांगलंच माहित होतं पण आता पोलिसांसमोर आणखी एक खुलासा झाला आहे. मुस्कानने स्नॅपचॅटवर तीन फेक आयडी तयार केले होते. ज्यामध्ये एक आयडी साहिलच्या आईच्या नावावरही होता. मुस्कान या तिन्ही अकाउंटवरून चॅट करत असे. "मुस्कान एक चांगली मुलगी आहे. तू तिच्यासोबत आनंदी राहशील" असं ती मेसेजमध्ये म्हणायची.
"मुस्कान चांगली मुलगी आहे"
साहिल शुक्ला अत्यंत अंधश्रद्धाळू होता. त्याला आई नव्हती. पण तो त्याच्या आईशी स्नॅपचॅटवर बोलत असे. त्याला वाटायचं की त्याची मृत आई त्याच्याशी बोलायची. मुस्कानलाही हे माहित होतं. मुस्कानने तिच्या भावाच्या मोबाईल नंबरवर हे अकाऊंट सुरू केलं होतं. त्याच नंबरवरून ती साहिलला त्याची आई म्हणून मेसेज करायची मुस्कान एक चांगली मुलगी आहे, तू तिच्यासोबत आनंदी राहशील असं सारखं म्हणायची. आईची ही आज्ञा समजून, साहिल मुस्कानवर आणखी प्रेम करू लागला. एवढंच नाही तर या अंधश्रद्धेमुळेच तो मुस्कानला सांगायचा की, तो सौरभचा वध करेल.
आनंदाचं नाटक... हसत नाचत होती मुस्कान; सौरभसोबतचा 'तो' शेवटचा Video, लेक होती सोबत
मेरठमधील सौरभ हत्याकांड प्रकरणात एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपी मुस्कान तिची मुलगी पिहू आणि पती सौरभसोबत नाचताना दिसत आहे. पिहूचा वाढदिवस २८ फेब्रुवारी रोजी होता आणि हा व्हिडीओ त्याच दिवशीचा असल्याचं म्हटलं जातं. व्हिडिओमध्ये मुस्कान तिचा पती आणि मुलीसोबत एका रेस्टॉरंटमध्ये आनंदाने नाचत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे याची पुष्टी झालेली नसली तरी तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.