सौरभ हत्याकांडात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलीस तपासात या हत्येत तिसऱ्या व्यक्तीचाही समावेश होता का? मृतदेह निळ्या ड्रममध्ये ठेवण्याची कल्पना कोणाची होती? हा संपूर्ण कट कधी रचला? सौरभची हत्या कशी आणि कधी केली? याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र तयार केलं आहे आणि लवकरच ते न्यायालयात सादर केलं जाईल असं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले आहेत. मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर विश्वास व्यक्त केला आहे आणि सौरभला लवकरच न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. सौरभ राजपूतच्या हत्येमागे कोणतीही काळी जादू नाही. मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांचं एकमेकांवर प्रेम करत होतं आणि त्यांना लग्न करायचं होतं, म्हणून दोघांनी मिळून सौरभ राजपूतची हत्या केली.
आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. या हत्या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सौरभ राजपूतची हत्या मुस्कान आणि साहिलने मिळून केली होती. सौरभची हत्या केल्यानंतर मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवण्याची कल्पना साहिलची होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
"आम्हाला फक्त एकदा भेटू द्या"; जेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी मुस्कान-साहिलची धडपड, पण...
सौरभची निर्घृण हत्या केल्यानंतर जेलमध्ये बंद असलेल्या साहिल आणि मुस्कानच्या विचित्र मागण्यांमुळे जेल अधिकारीही त्रस्त आहेत. दोघांनीही जेलमधील एकाच बॅरेकमध्ये एकत्र राहण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने नियमांचा हवाला देऊन हे नाकारलं. "आम्हाला फक्त एकदा भेटू द्या" असं ते अधिकाऱ्यांना सांगत आहेत. जेल अधीक्षक विरेश राज शर्मा यांनी यासाठी नकार दिला आहे.