वयाच्या १८ व्या वर्षी मुस्कान-सौरभने केलं लग्न, दोनदा घरातून पळाले; 'अशी' झाली पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 16:03 IST2025-03-22T16:03:12+5:302025-03-22T16:03:44+5:30

मुस्कान आणि सौरभच्या नात्याबद्दल आणखी एक सत्य समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

saurabh murder case update saurabh rajput muskan rastogi lovestory | वयाच्या १८ व्या वर्षी मुस्कान-सौरभने केलं लग्न, दोनदा घरातून पळाले; 'अशी' झाली पहिली भेट

वयाच्या १८ व्या वर्षी मुस्कान-सौरभने केलं लग्न, दोनदा घरातून पळाले; 'अशी' झाली पहिली भेट

मेरठच्या सौरभ हत्याकांडाची सर्वत्र चर्चा होत आहे. पत्नी मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसोबत मिळून पती सौरभची हत्या केली. याच दरम्यान, मुस्कान आणि सौरभच्या नात्याबद्दल आणखी एक सत्य समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. मुस्कानच्या आईच्या म्हणण्यानुसार, मुस्कान आणि सौरभ ११-१२ वर्षांचे होते तेव्हाच त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली.

मुस्कानचे आजोबा ब्रह्मपुरीमध्ये ज्योतिषी म्हणून काम करायचे. सौरभचं कुटुंब ब्रह्मपुरीमध्ये राहत होतं आणि त्याच्या आईचा ज्योतिषावर खूप विश्वास होता. त्या अनेकदा मुस्कानच्या आजोबांच्या घरी कुंडली दाखवण्यासाठी जायच्या. त्यावेळी त्या सौरभला सोबत घेऊन जात असे. मुस्कान तिच्या आजोबांच्या घरी राहत होती. त्यावेळी दोघांमध्ये मैत्री झाली, जी हळूहळू प्रेमात बदलली.

लग्न करण्याचा निर्णय

मुस्कान आणि सौरभ दोघेही लहानपणापासूनच लग्न करू इच्छित होते. १८ वर्षांचे झाल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा दोघांनीही आपापल्या कुटुंबांना लग्नाबद्दल सांगितलं. तेव्हा दोन्ही कुटुंबांनी स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांना समजण्याचा खूप प्रयत्न केला. मुस्कान आणि सौरभने कुटुंबीयांचं ऐकलं नाही आणि लग्न करण्यावर ठाम राहिले.

मुस्कान सौरभसोबत पळून गेली

एके दिवशी दुपारी मुस्कान घरातून पळून गेली आणि दोन दिवस तिचा पत्ता लागला नाही. नंतर, कुटुंबाला समजलं की मुस्कान सौरभसोबत पळून गेली आहे. दोन दिवसांनी पोलिसांच्या मदतीने दोघांनाही घरी परत आणण्यात आलं. यानंतर मुस्कान आणि सौरभ पुन्हा एकदा घरातून पळून गेले, पण परत आले.

वयाच्या १८ व्या वर्षी झालं लग्न

मुस्कानच्या आईने सांगितलं की, वयाच्या १८ व्या वर्षी लग्न झालं. एके दिवशी पहाटे ५ वाजता मुस्कान सौरभसोबत घरातून पळून गेली. नंतर दोघांनी लग्न केल्याचं समोर आलं. यानंतर सौरभच्या कुटुंबीयांनी तिला घराबाहेर काढलं. तेव्हापासून दोघेही भाड्याच्या घरात राहत होते. मुस्कानला हिरोईन होण्याचं वेड होतं. हिरोईन होण्यासाठीही मुस्कान घरातून पळून गेली होती. 
 

Web Title: saurabh murder case update saurabh rajput muskan rastogi lovestory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.