Saurabh Murder Case ( Marathi News ) : उत्तर प्रदेशमधील सौरभ हत्याकांडातील संशयीत आरोपी मुस्कान आणि साहिल या दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. साहिल आणि मुस्कान या दोघांना आधी न्यायालयात मारहाण झाली होती. तुरुंगात गेल्यानंतर, साहिल शुक्लाला मुलायजा बॅरेकमधील कैद्यांनी मारहाण केली. त्यावेळी गोंधळ उडाला होता, तेव्हा तुरुंगाच्या रक्षकांनी त्याला वाचवले.
साहिलने कैद्यांना मुस्कान सौरभला मारण्यासाठी सतत दबाव आणत होती असं सांगितलं आहे. साहिलला क्रोम हॉटेलमध्ये मुस्कानच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही आमंत्रित करण्यात आले नव्हते. मुस्कान पार्टीचा व्हिडीओ दाखवते. व्हिडिओमध्ये सौरभ मुस्कानला मिठी मारत नाचत होती. हे पाहून साहिलला राग आला होता.
खळबळजनक! एक आठवडा केली रिहर्सल; मुस्कान-साहिलने 'असा' रचला सौरभच्या हत्येचा कट
सौरभच्या हत्येचा कट वाढदिवसाच्या रात्रीच रचण्यात आला होता. त्या दिवशी सौरभने ते थंड पेय प्यायले नाही यामध्ये शामक औषध मिसळले होते. त्यानंतर, ३ मार्चच्या रात्री, सौरभच्या जेवणात शामक औषधे मिसळण्यात आली. त्या दिवशी, सौरभ बेशुद्ध झाल्यानंतर, मुस्कानने रात्री एक वाजता साहिलला फोन केला होता.
सौरभची हत्या केल्यानंतर दोघेही तीन वाजता सौरभच्या घरातून निघाले आणि साहिलच्या घरी गेले. ते पहाटे तिथे तांत्रिक विधी करत होते असा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर, ते पुन्हा सौरभचे डोके आणि हात घेऊन त्याच्या घरी पोहोचले, मृतदेह एका ड्रममध्ये ठेवला आणि सिमेंटने झाकला.
लग्न २०१६ मध्ये झाले होते
ब्रह्मपुरी येथील मुस्कान रस्तोगी उर्फ सोभी हिचा २०१६ मध्ये इंदिरा नगर येथील रहिवासी सौरभसोबत प्रेमविवाह झाला होता. २०१९ मध्ये, मुस्कानने पिहू नावाच्या मुलीला जन्म दिला. दरम्यान, मुस्कानची भेट ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या तिच्या वर्गमित्र साहिल शुक्लाशी झाली. साहिल मुस्कान आणि सौरभच्या आयुष्यात प्रवेश करताच त्यांच्यात वाद सुरू झाले होते.