अल्पवयीन मुलींवर गॅंग रेप प्रकारणी पाच तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 22:21 IST2022-12-17T22:20:00+5:302022-12-17T22:21:22+5:30
अन्य सहा तरुणांचा शोध पोलीस घेत आहेत. ह्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलींवर गॅंग रेप प्रकारणी पाच तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांकडून अटक
हितेंन नाईक, पालघर: माहीम येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलींवर गॅंग रेप प्रकारणी पाच २२ वर्षीय तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली असून अन्य सहा तरुणांचा शोध पोलीस घेत आहेत.ह्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या माहीम चौकी दुरक्षत्रातील माहीम पानेरी जवळ एका निर्जन ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या एका सोळा वर्षे तरुणीने ला काही तरुणांनी जबरदस्तीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची बाब समोर आली आहे आरोपी तरुणा पैकी अनेक तरुण हे गर्दच्या आहारी गेल्याची माहितीही समोर येत आहे ह्या मुलीला जबरदस्तीने निर्यात आल्यानंतर तिच्याशी अति जबरदस्ती करण्यात आल्यानंतर त्या मुलीने माहीम पोलीस चौकी गाठत ह्या तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर सातपाटी सागरी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. ही मुले माहीम,हनुमान पाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"