शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचानेच दिली विरोधकाला मारण्याची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 21:13 IST

राजकीय वादातुन मनसेचे उपविभागाध्यक्ष यांना जीवे मारण्याची सुपारी दिलेल्या किलरला हडपसर पोलिसांनी सापळा रचून पकडले.

ठळक मुद्देया प्रकरणामागे मांजरीचा सरपंच व सदस्य मुख्य सूत्रधार खुनासाठी १० लाखाची सुपारी घेतल्याची कबुलआरोपीनी वाघोली येथे थमार्कोल पुतळा करून गोळ्या मारण्याची केली प्रॅक्टीस

हडपसर : राजकीय वादातुन मनसेचे उपविभागाध्यक्ष विशाल ढोरे यांना जीवे मारण्याची सुपारी दिलेल्या किलरला हडपसरपोलिसांनी सापळा रचून पकडले. पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोन आरोपी अटक असून बाकीचे फरार आहेत. या प्रकरणामागे मांजरीचा सरपंच व सदस्य मुख्य सूत्रधार आहेत.मनसे उपविभागाध्यक्ष विशाल ढोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. आरोपींमध्ये मोसीन पठाण, (वय २०), शाहिद पटेल, इरफान पठाण (रा.सर्व वाघोली), दीपक भंडलकर, शिवराज घुले (वय ४२), प्रमोद कोद्रे (वय ४२) संतोष भंडारी (वय ३२) यांचा समावेश आहे.  हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी विशाल ढोरेच्या दिशेने एक गोळी झाडली होती. त्यावेळी एक मोकळी पुंगळी रस्त्यावर सापडली होती. रविवारी( दि. २१) सायंकाळी ६ वाजता ढोरे यांचा फोन सुनील तांबे यांना आला की, एका व्यक्तीने त्यांना फोन करून त्यांच्या खुनाची सुपारी घेतली असल्याचे सांगितले. तेव्हा तातडीने पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, संजय चव्हाण यांच्या दोन टीमला ट्रॅप लावायला सांगितले होते. त्यांच्या कारवाईमध्ये एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. आणि एक आरोपी ताब्यात घेतला होता. रात्री उशिरा दुसरा आरोपी ताब्यात घेतला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केला असता त्यांनी विशाल ढोरे याच्या खुनासाठी १० लाखाची सुपारी घेतल्याची कबुल केले होते. या सुपारीचे मुख्य सूत्रधार शिवराज घुले व प्रमोद कोद्रे यांनी आरोपींशी फोनवर बोलणी करून मारण्यास सांगितले होते. शिवराज घुले भाजपचे मांजरीचे सरपंच असून प्रमोद कोद्रे सदस्य आहेत. विशाल ढोरे व सरपंच घुले यांच्यात राजकीय वाद आहेत. त्यांच्या राजकीय वितुष्टाचे पर्यावसान सुपारी देण्यात झाले........................ शिवराज घुले व त्याच्या साथीदाराने सुपारी दिल्यानंतर मारेकरी ४ दिवस माग काढत होते. फियार्दी विशाल ढोरेने पोलीस अधिकारी सुनील तांबे यांना फोन केल्याने पोलिसांनी गांभीयार्ने कारवाई केली व आरोपी गजाआड केले. आरोपीनी वाघोली येथे थमार्कोल पुतळा करून गोळ्या मारण्याची प्रॅक्टीस केली होती.

टॅग्स :HadapsarहडपसरPuneपुणेPoliceपोलिसArrestअटकsarpanchसरपंचMNSमनसे