बिल्डरने फसवल्याने संतोष मोहितेने मंत्रालयासमोर केला आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 17:05 IST2018-11-22T17:04:39+5:302018-11-22T17:05:16+5:30

एका बिल्डरने १८ लाखांना गंडा घातला असून याप्रकरणाचा निकाल बिल्डरच्या बाजूने लागल्याने निराश झालेल्या संतोषने मंत्रालयासमोर आत्मदहन करायचं ठरवले होते.

Santosh Mohite tried to commit suicide in front of the ministry due to fraud by the builder | बिल्डरने फसवल्याने संतोष मोहितेने मंत्रालयासमोर केला आत्मदहनाचा प्रयत्न

बिल्डरने फसवल्याने संतोष मोहितेने मंत्रालयासमोर केला आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई - बिल्डरने १८ लाखांना फसवल्याने त्रस्त संतोष मोहितेने आज दुपारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी अंगावर केरोसीन ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. संतोष मोहिते हा इसम नवी मुंबई येथे राहणार असून त्यांना एका बिल्डरने १८ लाखांना गंडा घातला असून याप्रकरणाचा निकाल बिल्डरच्या बाजूने लागल्याने निराश झालेल्या संतोषने मंत्रालयासमोर आत्मदहन करायचं ठरवले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून संतोष मोहिते यांना ताब्यात घेऊन मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले.  

Web Title: Santosh Mohite tried to commit suicide in front of the ministry due to fraud by the builder