संजय राऊत यांच्या जामिनाची सुनावणी तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 06:34 IST2023-01-19T06:34:12+5:302023-01-19T06:34:34+5:30
ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

संजय राऊत यांच्या जामिनाची सुनावणी तहकूब
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी देण्यात आलेला जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ३ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.
११ नोव्हेंबर २०२२ रोजी विशेष न्यायालयाने राऊत यांची जामिनावर सुटका केली. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. एन. आर. बोरकर यांच्या एकलपीठाने ईडीच्या याचिकेवरील सुनावणी ३ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. संजय राऊत यांना ईडीने १ ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली. गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात अनियमितता करण्यात आल्याचे 'ईडी'चे म्हणणे आहे.