Sanjay Raut Patra Chawl ED Raid: संजय राऊत : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीचे मुंबईत तीन ठिकाणी छापे; अडचणी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 18:11 IST2022-08-17T18:11:05+5:302022-08-17T18:11:35+5:30
राऊतांच्या घरी ईडी सकाळी सकाळीच पोहोचली होती. त्यानंतर सायंकाळी राऊतांना ईडी आपल्या कार्यालयात घेऊन गेली होती. राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Sanjay Raut Patra Chawl ED Raid: संजय राऊत : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीचे मुंबईत तीन ठिकाणी छापे; अडचणी वाढणार?
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने मुंबईत छापेमारी सुरु केली आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊतांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. राऊत तुरुंगात जाऊन १७ दिवस झालेले असताना ईडीने पुरावे गोळा करण्यासाठी छापेमारी सुरु केली आहे.
राऊतांच्या घरी ईडी सकाळी सकाळीच पोहोचली होती. त्यानंतर सायंकाळी राऊतांना ईडी आपल्या कार्यालयात घेऊन गेली होती. यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयाने राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा चार दिवसांची वाढविण्यात आली होती. यानंतर १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या काळात संजय राऊतांच्या पत्नीला देखील ईडीने चौकशीला बोलविले होते.
आता १७ दिवसांच्या विश्रांतीनंतर ईडीने आज मुंबईत तीन ठिकाणी छापे मारले आहेत. मुलुंड, विक्रोळी, भांडूप या भागात ईडीने छापा टाकला आहे.
जामीन कधी मिळणार ?
पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. 08 ऑगस्ट रोजी त्यांची ईडी कोठडी संपली. त्यानंतर त्यांना कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत म्हणजेच आणखी 12 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले जाईल. दरम्यान, शिवसेना नेते आणि राऊतांचे बंधू सुनील राऊत हे संजय राऊतांच्या जामीनासाठी प्रयत्न करत आहेत.