Sameer Khan remanded in judicial custody for 14 days | समीर खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तस्कर सजनानी कनेक्शन

समीर खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तस्कर सजनानी कनेक्शन


मुंबई : अमली पदार्थ खरेदीप्रकरणी अटकेत असलेल्या समीर खान याला सोमवारी न्यायालयात हजर  करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. परदेशी तस्कराशी कनेक्शन आणि त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास करण्यात येत असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

समीर खान हा अल्पसंख्याक विकास मंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांचा जावई आहे. गेल्या आठवड्यात अमली पदार्थ विराेधी पथकाने (एनसीबी) परदेशी ड्रग्ज तस्कर करण सजनानीला अटक करून २०० किलो परदेशी गांजा जप्त केला होता. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून समीर खानचे नाव समोर आल्याने एनसीबीने त्याला बुधवारी अटक केली. त्यानंतर त्याच्या वांद्रेतील घर व कार्यालयात छापे टाकले. त्याचे बँक व अन्य आर्थिक व्यवहाराबाबतचे दस्तऐवज, कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाइल व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. त्यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत.

Web Title: Sameer Khan remanded in judicial custody for 14 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.