शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सॅल्यूट टू मुंबई पोलीस... महिला कॉन्स्टेबल जिजाबाईंमुळे 'ती' परतली सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 21:36 IST

आई टीव्ही पाहण्यास अटकाव करत असल्याने पुण्याची मुलगी मुंबईला पळाली

मुंबई - १५ ऑगस्ट दिवशी सर्वच देशाचा स्वातंत्र दिन साजरा करण्यात व्यग्र होतो. मात्र, आपल्या सुरक्षेसाठी मुंबईपोलिसांनी कंबर कसली होती. कुलाबा पोलिसांची व्हॅन गस्त घालत असताना कुलाबा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल जिजाबाई पवार यांना गेट ऑफ इंडिया येथे एक १७ वर्षाची मुलगी एकटीच फिरताना आढळली. त्यावेळी जिजाबाई सतर्कता दाखविल्याने शुल्लक कारणावरून घरातून पळून मुंबईत आलेल्या मुलीला सुखरूप तिच्या पुण्यातील घरी सोडण्यास कुलाबा पोलिसांना यश आलं आहे. 

महिला कॉन्स्टेबल जिजाबाई पवार स्वातंत्र्यदिनाला गेट वे ऑफ इंडियावर गस्त घालत होत्या. यावेळी तिथे एक अल्पवयीन तरुणी एकटीच फिरत असल्याचं त्यांना आढळलं. त्यांनी तरुणीला नाव विचारत तिची चौकशी केली. त्यावेळी तिने आपलं नाव आणि वय सांगत आपण पुण्याची रहिवासी असून खूप वर्षांपूर्वी आई-वडिलांचं निधन झालं असल्याचं सांगितलं. तरुणीच्या उत्तरावर संगीता पवार यांना समाधान झालं नाही. त्यांनी तिला विश्वासात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तिला चहा बिस्कीट देत अजून विचारपूस केली असता तिने खरी माहिती जिजाबाई यांना सांगितली अशी माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांनी दिली. आईने टीव्ही पाहण्यावरुन ओरडल्याने नाराज झाले होते. तोच राग मनात ठेवून रागात मी घर सोडले आणि देहू येथून थेट मुंबई गाठली अशी माहिती अल्पवयीन तरुणीने दिली. यानंतर तरुणीकडून तिच्या आई-वडिलांना फोन नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क पोलिसांनी संपर्क साधला. त्यांच्याकडून योग्य ते पुरावे मिळाल्यानंतरच त्यांना मुलीचा ताबा देण्यात आले असे पुढे धोपावकर म्हणाले. वेळीच प्रसंगावधान दाखवत मुलीला सुखरुप तिच्या पालकांकडे सोपवल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल जिजाबाई पवार यांना सन्मानित करून बक्षीस देण्यात यावे यासाठी वरिष्ठांकडे शिफारस करण्यात आली असल्याची माहिती धोपावकर यांनी दिली. ही तरुणी अल्पवयीन असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची भीती होती. मात्र जिजाबाई यांनी कर्तव्यावर असताना योग्य सतर्कता आणि प्रसंगावधान दाखविल्याने मुंबई पोलिसांची मान जरूर उंचावली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPuneपुणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र