शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

'सलमान खानला मारणार...', गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पोलीस कोठडीत दिली धमकी; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:52 IST

Sidhu moose wala killer gangster lawrence bishnoi : सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ 2021चा आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागील सूत्रधार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तुरुंगात असताना लॉरेन्स बिश्नोईने दबंग खानच्या हत्येबद्दल बोलला होता. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ 2021चा आहे.लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ व्हायरलहा Exclusive व्हिडिओ 2021 सालचा आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीतील गुंडांना वेगवेगळ्या राज्यांतून मोक्का प्रकरणात रिमांडवर घेतले होते. व्हिडिओमध्ये लॉरेन्स आणि त्याच्यासोबत संपत नेहरा आहेत. लॉरेन्सचा जवळचा मित्र आणि राजस्थानचा गँगस्टर असलेल्या संपत नेहराने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेस केली. मात्र घटनेपूर्वीच हरियाणा पोलिसांनी त्याला अटक केली होती.

'सलमानला जोधपूरमध्ये मारणार'या व्हिडिओमध्ये लॉरेन्स बिश्नोई म्हणत आहेत - जेव्हा आम्ही करू, तेव्हा कळेल. सलमान खानला मारणार, या जोधपूरमध्ये मारणार, तेव्हा त्याला कळेल. मी अजून काही केले नाही, विनाकारण मला यात ओढले जात आहे.

सलमानवर का नाराज आहे लॉरेन्स बिश्नोई?लॉरेन्स बिश्नोईने 2018 मध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचवर्षी त्याचा मित्र संपत नेहरा यानेही सलमानच्या घराची रेकी केली होती. दबंग खानला टार्गेट करण्याचे सर्व नियोजन करण्यात आले होते. जेव्हापासून सलमान खानवर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप झाला होता. या दिवसापासून लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या मागे लागला आहे. गँगस्टर लॉरेन्स हा बिश्नोई समाजातील असल्यामुळे ते काळ्या हरणाला पवित्र प्राणी मानतात. त्यामुळेच सलमानने काळ्या हरणाची शिकार केल्यावर तो नाराज झाला होता. 'रेडी' चित्रपटाच्या शूटिंगनंतर या गुंडाने सलमान खानवर हल्ला करण्याचा कट आखला होता. तो कट अयशस्वी झाला होता. याचे कारण म्हणजे लॉरेन्स बिश्नोईला तेव्हा सलमानला मारण्यासाठी त्याच्या आवडीचे शस्त्र मिळाले नव्हते.तुरुंगात बसून सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट आखण्यात आला होता ही कुख्यात टोळी पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्याचे नेटवर्क इतके मजबूत आहे की, लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात राहून खून करू शकतो. जसे की गायक सिद्धू मुसेवालाच्या बाबतीत घडले. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. तुरुंगात, त्याने त्याचा साथीदार गोल्डी ब्रारसोबत पंजाबी गायक सिंधू मुसेवालाच्या हत्येचा कट रचला. गायकाच्या मृत्यूनंतर लॉरेन्स बिश्नोई याने फेसबुक पोस्टवर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

टॅग्स :Salman Khanसलमान खानjailतुरुंगPoliceपोलिसPunjabपंजाब