शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

बनावट कागदपत्रांचा वापर करून जप्त केलेल्या कारची विक्री, आरटीओ अधिकाऱ्यांसह 12 जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 09:06 IST

Crime News: वाशी आरटीओचे तत्कालीन अधिकारी दशरथ वाघुले, राजेंद्र सावंत यांच्यासह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा १२ जणांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कर्जाचे हप्ते थकल्याने जप्त केलेल्या कारची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन आरटीओ अधिकाऱ्यांसह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खोटी तक्रार देऊन एपीएमसी पोलिसांचीदेखील फसवणूक करण्यात आली आहे.वाशी आरटीओचे तत्कालीन अधिकारी दशरथ वाघुले, राजेंद्र सावंत यांच्यासह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा १२ जणांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी संगनमत करून जप्तीतल्या कारची परस्पर विक्री केल्याचा आरोप सीवूड येथील बाळासाहेब चलर यांनी केला आहे. चलर यांनी २०१३ मध्ये २६ लाखांची कार खरेदी केली होती. त्यासाठी एचडीएफसीमधून २२ लाखांचे कर्ज काढले होते. काही महिन्यांतच हे कर्ज त्यांनी कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडमध्ये वर्ग केले होते. २०१६ मध्ये व्यवसायातील तोट्यामुळे त्यांचे काही हप्ते थकले होते. त्यामुळे कोटक महिंद्राच्या रिकव्हरी एजंटने कोणतीही पूर्वसूचना न देता कार जप्त केली. त्यानंतर एक महिन्याने त्यांना ७ लाख ६६ हजार भरून कार घेऊन जाण्यास सांगण्यात आले. शिवाय तडजोड करून त्यांना ४ लाख २५ हजार भरण्यास सांगण्यात आले.यानुसार पुढील काही महिन्यात चलर यांनी पूर्ण रक्कम भरूनदेखील त्यांना कारचा ताबा देण्यास टाळाटाळ सुरू होती. अखेर त्यांनी वाशी आरटीओमध्ये चौकशी केली असता त्यांच्या कारचा बाजारभाव १८ लाख असतानाही १२ लाखाला विकली असल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी सदर कार ट्रान्सफर होऊ नये यासाठी आरटीओला पत्र दिले. त्यानंतरही सदर कार विजय गारोडकर याच्या नावे ट्रान्सफर करण्यात आली. त्यासाठी कोटक महिंद्रा यांच्याकडून आरटीओकडे कोरी एनओसी जमा करण्यात आली होती; परंतु गाडीची मूळ कागदपत्रे चलर यांच्याकडेच असताना गाडी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर कशी ट्रान्सफर झाली याबाबत आरटीओकडे चौकशी करूनही त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. 

पोलिसांचीही फसवणूक-चलर यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यातल्या नोंदी तपासल्या असता, गाडीचे आरसी बुक व इतर कागदपत्रे आरटीओमधून गहाळ झाल्याची खोटी तक्रार दिल्याचे समोर आले. -गाडीची सर्व कागदपत्रे चलर यांच्याकडे असताना ती आरटीओमध्ये जमा असून, गहाळ झाली असल्याची खोटी तक्रार देण्यात आली होती. यावरून गाडीच्या विक्रीसाठी खोटी तक्रार देऊन पोलिसांचीही फसवणूक केल्याचे समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRto officeआरटीओ ऑफीसNavi Mumbaiनवी मुंबई