भुसावळनजीक जुन्या वादातून सख्या भावांचा खून; थरारक घटनेनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 00:05 IST2023-09-02T00:05:10+5:302023-09-02T00:05:43+5:30
शांताराम भोलानाथ साळुंखे(२८) व राकेश भोलानाथ साळुंखे (३३, दोघे रा. कंडारी) अशी खून झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.

भुसावळनजीक जुन्या वादातून सख्या भावांचा खून; थरारक घटनेनं खळबळ
भुसावळ (जि. जळगाव) : भुसावळनजीक असलेल्या कंडारीत जुना वाद उफाळून आला. यात दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आल्याची थरारक घटना घडली. यामुळे भुसावळसह कंडारी परिसर हादरला आहे. शुक्रवारी रात्री १०:३० ते ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात दोन जण जखमी गंभीर असल्याची माहिती मिळाली.
शांताराम भोलानाथ साळुंखे(२८) व राकेश भोलानाथ साळुंखे (३३, दोघे रा. कंडारी) अशी खून झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. तर विकी सपकाळे व सागर हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुन्या व्यवसायिक वादातून ही घटना घडली असावी. आरोपींची नावे निष्पन्न झाली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघम, बाजारपेठचे निरीक्षक बबन आव्हाड, दोन्ही पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यासाठी पथके रवाना झाली आहेत.