शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

साई मंदिर फोडणारे चोरटे अटकेत; चार घरे आणि वाहनांच्या बॅटऱ्या चोरल्याचीही दिली कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 5:57 PM

चिकलठाणा विमानतळासमोरील साई मंदीर फोडून चांदीच्या पादुका आणि चांदीचा मुकूट चोरणारे अटकेत

औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळासमोरील साई मंदीर फोडून चांदीच्या पादुका आणि चांदीचा मुकूट चोरणाऱ्या  चोरट्यांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. अटकेतील आरोपींनी अन्य चार घर फोडल्याचे आणि  विविध वाहनांच्या १५ बॅटऱ्या पळविल्याची कबुली दिली.त्यांच्याकडून सुमारे पावणेतीन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. आरोपींमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त मुलाचा (अल्पवयीन )समावेश आहे. 

सचिन  अशोकराव रोकडे, (वय २४), समाधान राजू डोळसे (वय १८) , राहुल दत्तू आव्हाड(वय १८, सर्व रा. ,रा. शहानगर, मसनतपुर) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे म्हणाले की, १५ आॅगस्ट रोजी चिकलठाणा येथील साई मंदीर फोडून चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे मुकुट आणि चांदीच्या पादूका चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी प्रवीण प्रकाशराव कुलकर्णी यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. 

या गुन्ह्याचा तपास करीत असताना सचिन रोकडे हा या चोरीमागे असल्याची  माहिती डी.बी. पथकाला समजली. अधिक तपास केला असता रोकडे हा मोरेगिर (ता. पाटण, जि.सातारा) येथे असल्याची कळाले. त्यास मोरेगिर येथे जाऊन पोलिसांनी पकडून आणले. त्याची कसून चौकशी केली असता अन्य तीन साथीदारांच्या मदतीने साई मंदीर फोडल्याची कबुली दिली. साईमंदीरातून चोरलेले चांदीच्या पादुका आणि चांदीच्या मुकुट  काढून दिले. याशिवाय शेख नईम शेख चांद आणि भाऊसाहेब किसनराव सातदिवे यांच्यासह चार घरे फोडल्याची कबुली दिली. या घरातून पळविलेले सोन्याचे दोन सेवन पीस, सोन्याचे सहा मनीमंगळसुत्राच्या पोती, एक घड्याळ, चांदीच्या दोन अंगठ्या असा ऐवज काढून दिला.  ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे कर्मचारी मुनीर पठाण, गणेश राजपूत, विक्रम वाघ, शाहिद पटेल, नितेश सुंदर्डे, नवनाथ ढगे यांनी केली.

टॅग्स :theftचोरीArrestअटकAurangabadऔरंगाबाद