Sahel Rapes As Sunny For 4 Years, Case Under New Law Sections In Barwani Madhya Pradesh | सोहेलनं सनी बनून केलं युवतीचं लैंगिक शोषण; धार्मिक स्वातंत्र्यता कायद्यानुसार पहिलाच गुन्हा नोंद

सोहेलनं सनी बनून केलं युवतीचं लैंगिक शोषण; धार्मिक स्वातंत्र्यता कायद्यानुसार पहिलाच गुन्हा नोंद

ठळक मुद्दे रविवारी युवती आणि युवकामध्ये काही कारणावरून भांडण झालेयुवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहेल उर्फ सनीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.सोहेल उर्फ सनीने स्वत:चा धर्म लपवला होता, लग्नाचं आमिष देत युवतीसोबत संबंध ठेवले

बडवानी – मध्य प्रदेशात काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लव्ह जिहादविरोधात कडक पाऊल उचलण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर मध्य प्रदेशात लव्ह जिहादविरुद्ध कायदा बनवण्यात आला. लव्ह जिहादसाठी मध्य प्रदेशात नवीन धार्मिक स्वातंत्र्यता कायद्यानुसार आता पहिलाच गुन्हा नोंद झाला आहे. राज्यातील बडवानी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली, त्यात युवकावर या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी सोहेलने सनी नाव सांगून एका युवतीला लग्नाचं आमिष दाखवलं, त्यानंतर गेल्या ४ वर्षापासून आरोपी युवकानं मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवले, रविवारी युवती आणि युवकामध्ये काही कारणावरून भांडण झाले, त्यानंतर युवतीने बोलण्यास नकार  दिला तेव्हा युवकाने जबरदस्तीने तिला मारहाण करण्यात आली. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहेल उर्फ सनीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पलसूद येथील रहिवाशी सोहेल मंजूम मंसूरीच्या विरोधात नव्या धार्मिक स्वातंत्र्यता कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक राजेश यादव म्हणाले की, २२ वर्षाची मुलगी बडवानी येथे एका दुकानाता कामाला आहे. आरोपी सोहेलने रविवारी युवतीसोबत फोनवरून बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीने बोलण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने दुपारी ३ वाजता दुकानात जाऊन युवतीला मारहाण केली तसेच तिला जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

सोहेल उर्फ सनीने स्वत:चा धर्म लपवला होता, लग्नाचं आमिष देत युवतीसोबत संबंध ठेवले, ज्यावेळी मुलाची खरी ओळख मुलीच्या नातेवाईकांना समजली तेव्हा दोघांच्या नात्याला कुटुंबीयांनी विरोध केला. यावर सोहेलने मुलीसोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलीनं याबाबत आईला आणि भावाला सांगितले, त्यानंतर कुटुंबीयांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

२०१६ मध्ये डिजे घेऊन गावात आलेला युवक

मुलीने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, २०१६ च्या ऑगस्ट महिन्यात सोहेल उर्फ सनी गावच्या एका कार्यक्रमात डिजे घेऊन आला होता, त्यावेळी मुलीसोबत त्याची ओळख झाली, यावेळी मुलाने त्याचं नाव सनी असल्याचं सांगितले, दोघांच्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं, युवकाने लग्नाचं आमिष देत युवतीसोबत शारिरीक संबंध ठेवले, त्यानंतर युवकाचं याआधीच लग्न झाल्याचं मुलीला कळालं, जेव्हा मुलीने मुलासोबत बोलणं सोडलं तेव्हा आरोपी युवकाने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी नव्या कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.

Read in English

Web Title: Sahel Rapes As Sunny For 4 Years, Case Under New Law Sections In Barwani Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.