ईडीकडून सचिन वाझेची दुसऱ्या दिवशीही चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 05:39 AM2021-07-12T05:39:18+5:302021-07-12T05:41:35+5:30

तळोजा कारागृहात जाऊन जबाब नोंदवला. यापूर्वी शनिवारीही नोंदवण्यात आला होता जबाब.

Sachin Waze questioned by ED on second day mumbai parambir singh | ईडीकडून सचिन वाझेची दुसऱ्या दिवशीही चौकशी

संग्रहित छायाचित्र

Next
ठळक मुद्देतळोजा कारागृहात जाऊन जबाब नोंदवला.यापूर्वी शनिवारीही नोंदवण्यात आला होता जबाब.

कारमायल रोडवरील कारमध्ये ठेवलेली स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी व बडतर्फ एपीआय सचिन वाझे याची तळोजा कारागृहात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. 

मुंबईतील बारमालकांकडून केलेली हप्ता वसुली आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या अनुषंगाने त्याच्याकडे ४ तास विचारणा करण्यात आली. ईडीच्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना सोमवारी त्याच्यासमोर बसवून विचारणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक अहवालावरून ईडीने  मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार व कारमधील स्फोटके व हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी वाझेकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सहा तास चौकशी केली होती. मात्र, ती पूर्ण न झाल्याने रविवारी सकाळी पुन्हा पथक तळोजा जेलमध्ये पोहोचले. वाझेकडे सुमारे चार तास चौकशी केली.

वाझेला मुंबईतील बार 
चालकांकडून दर महिना १०० कोटी वसूल करून देण्याचे टार्गेट देशमुख यांनी दिले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.  या प्रकरणाचा तपास दोन, अडीच महिन्यांपासून देशमुख आणि त्यांच्या दोघा पीएच्या भोवती सुरू होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची व्याप्ती वाढवून तत्कालीन आयुक्त आणि इतरांच्या जबाबदारी निश्चित करण्याची सूचना सीबीआयला केली आहे. 

Web Title: Sachin Waze questioned by ED on second day mumbai parambir singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.