Sachin Vaze : सचिन वाझे यांचं मीरारोड कनेक्शन उघड; NIAची कनकिया परिसरातील फ्लॅटवर धाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 18:01 IST2021-04-02T18:00:42+5:302021-04-02T18:01:48+5:30
Sachin Vaze : सदनिका मालक आणि त्यातील भाडेकरू महिलेची चौकशी करण्यात आली.

Sachin Vaze : सचिन वाझे यांचं मीरारोड कनेक्शन उघड; NIAची कनकिया परिसरातील फ्लॅटवर धाड
मीरारोड - सचिन वाझे प्रकरणी एनआयएने मीरारोडच्या कनकिया भागातील ७११ कॉम्प्लेक्स वसाहतीत धाड टाकून एका सदनिकेची तपासणी केली. सदनिका मालक आणि त्यातील भाडेकरू महिलेची चौकशी करण्यात आली.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटीन कांड्या आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील अटक सचिन वाझेशी संबंधित तपासाचे धागेदोरे मीरारोडपर्यंत पोहचले आहेत. एनआयएने गुरुवारी मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कनकिया परिसरातील सेव्हन इलेव्हन रेसिडेन्सीमधील सी विंगच्या फ्लॅट नंबर ४०१ मध्ये पथकाने तपासणी केली.
Sachin Vaze: NIA ची धडक कारवाई,‘मिस्ट्री वुमन’ला घेतलं ताब्यात; सचिन वाझेचा खेळ खल्लास?
सदर सदनिका पियुष गर्ग यांची असून जाफर शेख ह्या इस्टेट एजंटच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून मीना जॉर्ज ह्या त्यांच्या मुलांसह भाड्याने रहात होत्या. गेल्या सुमारे १५ दिवसांपासून सदर सदनिका बंद होती. त्यात राहणारे भाडेकरू अचानक सदनिका बंद करून गेले होते. मीना ही वाझेच्या परिचयातील असून तिला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिला सुद्धा तिच्या मीरारोडच्या घरी आणण्यात आले. त्याठिकाणी मालक गर्ग, भाडेकरू मीना यांची चौकशी तसेच सदनिकेत कसून तपासणी करण्यात आली असे सूत्रांनी सांगितले.