शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

Sachin Vaze : सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 6:38 PM

Sachin Vaze : भिवंडीतील ज्या खासगी रुग्णालयात सचिन वाझे यास दाखल केले आहे तेथून ठाणे शहर अगदी हाकेच्या म्हणजेच सधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे.

ठळक मुद्देभिवंडीतील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे. 

नितिन पंडीत 

भिवंडी - मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची प्रकृती बिघडल्याने त्याला भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी मंगळवारी दाखल करण्यात आले आहे . विशेष म्हणजे मनसुख हिरेन हत्याकांडा बरोबरच मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ जिलेटीन ठेवल्याने सचिन वाझे देशभर चर्चेत आला आहे . या प्रकरणात त्याला अटक केल्या नंतर त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती . कारागृहात वाझे यास हृदय विकाराचा त्रास झाल्याने वाझे याच्या निकटवर्तीयांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली होती . त्यांनतर त्यास भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे. 

 विशेष म्हणजे एखाद्या गंभीर प्रकरणातल्या आरोपीवर भिवंडीतील खासगी रुग्णालयात नेमके का दाखल करण्यात आले , हे सध्या तरी न उलगडणारे कोडे आहे. महत्वाचे म्हणजे सचिन वाझे अटकेपूर्वी पोलीस अधिकारी असल्याने त्याचा ठाण्यात चांगलाच दबदबा आहे. त्यातच भिवंडीतील ज्या खासगी रुग्णालयात सचिन वाझे यास दाखल केले आहे तेथून ठाणे शहर अगदी हाकेच्या म्हणजेच सधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सचिन वाझे यास खरोखरच उपचारासाठी भिवंडीसारख्या ठिकाणी दाखल केले आहे किंवा त्यामागे काहीतरी राजकारण असावे अशी चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे. 

सचिन वाझे यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भिवंडीतील खासगी रुग्णालयात मंगळवारी ( आज ) चार वाजता दाखल करण्यात आले आहे अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेhospitalहॉस्पिटलNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिसArrestअटकbhiwandiभिवंडीMansukh Hirenमनसुख हिरण