Sachin Vaze : मुंबई पोलिसांकडून सचिन वाझेला सेवेतून काढण्याची प्रक्रियेला वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 15:56 IST2021-04-13T15:32:46+5:302021-04-13T15:56:45+5:30
Sachin Vaze :सचिन वाझेविरोधात भा. दं. वि.1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Sachin Vaze : मुंबई पोलिसांकडून सचिन वाझेला सेवेतून काढण्याची प्रक्रियेला वेग
अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजेंना आता पोलीस सेवेतून काढण्याची प्रक्रिया मुंबईपोलिसांनी सुरु केली आहे. सचिन वाझेविरोधात भा. दं. वि.1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओत सापडलेल्या स्फोटक प्रकरणात एनआयएने सचिन वाझेंना अटक केल्यानंतर ही प्रक्रियेच्या हालचालींना मुंबई पोलिसांकडून वेग आला आहे. सचिन वाझेंची शेवटची पोस्टिंग विशेष शाखेत झाली होती, त्यामुळे ही प्रक्रिया संबंधित विभागाची जबाबदारी असल्याची मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
सचिन वाझेंचा आणखी एक कारनामा उघड; TRP घोटाळ्याप्रकरणी ३० लाख घेतल्याने ईडी करणार सखोल चौकशी
काही दिवसांपूर्वीच विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांनी महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएला पत्र लिहून सचिन वाझेंच्या या प्रकरणातील समावेशासंबंधित कागदपत्रांची मागणी केली होती, ज्याच एफआयआर कॉपीचाही उल्लेख होता. हे कागदपत्र सोमवारीच विशेष शाखेला सोपवण्यात आले आहेत. नंतर विशेष शाखेचे अधिकारी यावर आपला अहवाल बनवून राज्य सरकारला सोपवेल आणि वाझेंवर भा. दं. वि. 1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी मागतील. मुंबई पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्हाला ATS आणि NIA कडून अहवाल मिळाला आहे, जो आम्ही आता लीगल सेलला पाठवू आणि पुढील प्रक्रिया सुरु केली जाईल. जर सचिन वाझेविरोधात दिलेल्या अहवालाशी सरकार सहमत असेल तर त्यांना सेवेतून काढण्यात येईल.