शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

‘झिकझॅक’ ड्रायव्हिंगचा पोलीस आयुक्तांच्या गाडीलाच ‘दणका ’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 9:49 PM

भरधाव जाणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने...त्यांचा उरात धडकी भरवणारा वेग आणि वाहनचालकांची बेदरकार वृत्ती याचा अनुभव सर्वसामान्य नागरिक नेहमीच घेत असतात. मात्र,....

ठळक मुद्देतरुणावर कारवाई : भरधाव दुचाकीने दिली शासकीय वाहनाला धडकविविध कलमांखाली या तरुणाकडून ३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूलवाहतूक पोलीस शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी विविध उपाययोजना

- लक्ष्मण मोरे- पुणे : भरधाव जाणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने...त्यांचा उरात धडकी भरवणारा वेग आणि वाहनचालकांची बेदरकार वृत्ती याचा अनुभव सर्वसामान्य नागरिक नेहमीच घेत असतात. मात्र, स्वत: पोलीस आयुक्तांनाच या बेदरकारपणाचा नुकताच अनुभव आला. पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या शासकीय मोटारीला झिकझॅक ड्रायव्हिंग करत आलेल्या दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिल्याची घटना गेल्या मंगळवारी (दि. १२) घडली. या तरुणाकडून विविध कलमांखाली ३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या घटनेची चर्चा पोलीस आयुक्तालयामध्ये आठवड्याभरानंतरही रंगलेली आहे.  वाहतूक पोलीस शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी विविध उपाययोजना राबवित आहेत. त्यातच सध्या  ह्यमार्च एंडह्ण असल्याने जोरदार दंड वसूलीही सुरु आहे. पोलीस आयुक्त त्यांच्या शासकीय मोटारीमधून किराड चौकामधून जात होते. त्यावेळी चालक आणि एक पोलीस कर्मचारीही त्यांच्या सोबत होता. किराड चौकामध्ये पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने या मोटारीला धडक दिली. मोटारीचा पाठीमागील भाग चेपला. या घटनेची पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यानंतर, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित दुचाकी चालक तरुण परप्रांतिय असून शिक्षणासाठी पुण्यात आलेला आहे. तो चालवित असलेली दुचाकी पुण्यातील स्थानिक मालकाची होती. पोलिसांनी या तरुणाकडे ड्रायव्हींग लायसन्सची मागणी केली; मात्र, त्याच्याकडे लायसन्स नसल्याचे समोर आले. यासोबतच त्याने हेल्मेट परिधान केलेले नव्हते. या सर्व कलमांसोबतच धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याप्रकरणी त्याच्यावर दंड आकारणी करण्यात आली. चार विविध प्रकारच्या कलमांखाली त्याच्यावर कारवाई करीत चलन फाडण्यात आले. यामध्ये दुचाकी मालकालाही दंड करण्यात आला. ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही दुचाकी चालविण्यास दिल्याप्रकरणी हा दंड करण्यात आला. तरुणाला एकूण ३ हजार २०० रुपये आणि दुचाकी मालकाला ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. संबंधित तरुणानेही हा दंड आॅनलाईन पद्धतीने भरला. या घटनेला एक आठवडा उलटून गेला आहे. मात्र, या घटनेची चर्चा पोलीस आयुक्तालयामध्ये सुरु आहे. एरवी नागरिकांना वाहनांच्या बेदरकार वृत्तीचा सामना करावा लागतो. त्याबाबत नागरिक सतत तक्रार करीत असतात. मात्र, थेट पोलीस आयुक्तांनाच हा अनुभव आल्याने यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसही उपाययोजना आणि कारवाई करतील अशी आशा व्यक्त होत आहे.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर