कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; वाकोल्यात पोलिसाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 16:57 IST2021-07-19T16:56:14+5:302021-07-19T16:57:12+5:30
Police Committed Suicide : प्रकार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आला.

कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; वाकोल्यात पोलिसाची आत्महत्या
ठळक मुद्देवाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूनयना नटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
मुंबई: वाकोला पोलिसांच्या हद्दीत स्टाफ क्वॉटर्समध्ये निखिल शंकर मोरे नामक पोलीस कॉन्स्टेबलचा गळफास घेतलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. मृत आणि त्यांची पत्नी हे लोकल आर्म्स विभागात कार्यरत असून या जोडप्याला पाच महिन्यांचा मुलगा आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आला. वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूनयना नटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
थरार! बोरिवली येथे भररस्त्यात वकिलावर तलवारीने केले सपासप वारhttps://t.co/64PkUCN4gu
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2021