शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मार्केटयार्ड परिसरात भरदिवसा रॉडने हल्ला करून व्यापार्‍याच्या दिवाणजीला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 12:09 IST

साडे तीन लाखांची रक्कम जबरी चोरी

ठळक मुद्देमार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल

 पुणे : व्यापारातून आलेली रक्कम बँकेत भरण्यासाठी निघालेल्या कर्मचार्‍याला रस्त्यात गाठून त्यावर रॉडने हल्ला करून त्याच्याजवळील ३ लाख ३० हजारांची रक्कम चोरट्यांनी जबरी चोरून केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरात घडली. याबाबत तेलाचे व्यापार्‍याकडे दिवाणी म्हणून नोकरीस असलेल्या सुमंतीलाल चंदनलाल ओस्तवाल (वय ६९, रा. गंगानगर, आकुर्डी प्राधिकरण) यांनी याबाबत मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी दुचाकीवर आलेल्या तिघांवर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायकुमार नहार हे तेलाचे व्यापारी असून त्यांचा मार्केटयार्डात गाळा आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास  ओस्तवाल हे त्यांच्या मालकाच्या व्यापाराची जमा झालेली 3 लाख 30 हजार रूपयांची रक्कम भरण्यासाठी दुचाकीवरून जवळच असलेल्या पुणे पीपल्स बँक येथे भरण्यासाठी घेऊन जात होते. त्यांनी पैशाची बँक त्यांच्या दुचाकीला मागील बाजूस अडकवली होती.  ओस्तवाल हे दुचाकीवर बाहेर पडल्यानंतर काही मिनीटातच त्यांच्या दुचाकीला तिघांनी त्यांची दुचाकी आडवी घातली. त्यांना तुम्हाला दुचाकी चालवता येत नाही का ? म्हणत त्यांच्याशी हुज्जत घातली. याच दरम्यान त्यातील एकाने दुचाकीच्या हुकाला अडकवलेली पैशाची बॅग हिसकाऊन घेतली. ओस्तवाल यांनी त्या चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातील एकाने त्याच्या हातातील रॉड त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. व  बॅग जबरी चोरी करून नेली. सध्या गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी तपासपथके कामाला लागली आहेत. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक जी. जी. खरात करत आहेत.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी