शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

रेल्वे प्रवाशांची फसवणूक करुन मारहाण करत लूट करणारी गॅंग जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:48 PM

उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील प्रवाशांना लुटले; लुटारु नागपाडा, मुंबई येथील रहिवासी

ठळक मुद्दे कल्याण रेल्वे स्थानकातील सीसी फुटेज तपासण्यात आले.. सीसीटीव्हीत मिळालेले फुटेज आणि प्रत्यक्ष आरोपी हेच असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या चौघांना मंगळवारी अटक करण्यात आली

डोंबिवली - उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमधील रहिवासी असलेले प्रवासी गावाला जातांना त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात हेरून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून रेल्वे प्रवासात त्यांना जागा मिळवून देण्यासाठी कुर्ला स्थानकात जाण्याची गरज असल्याचे विश्वासात घेऊन सांगायचे, आणि त्यानंतर तेथे नेऊन रेल्वे रुळामध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मारहाण करुन त्या प्रवाशांजवळील मोबाइल, रोख रक्कम यासह अन्य ऐवज लुटणा-या चौघा लुटारूंना कल्याण लोहमार्ग पोलीसांनी मंगळवारी अटक केली. मोहम्मद चाँद लुले खान(२३), अफजल कासिम खान(२२), दिन मोहम्मद अयुब खान (३५), फरमान रज्जब खान (२४) अशी त्या अटक केलेल्या चौघांची नावे असून चौघेही रा. सागर हॉटेल समोरील फुटपाथ, मौलाना आझाद रोड, नागपाडा, मुंबई या ठिकाणी वास्तव्याला असल्याचे पोलीसांनी सांगितले.यासंदर्भात निलेश विजेंद्र प्रसाद (२३), रा. उत्तरप्रदेश, व्यवसाय मजूरी यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार तक्रारदार हे २३ मे रोजी त्यांचे वडील, दोन मित्रांसमवेत गावी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात आले होते. तक्रारदार तिकिट हॉलमध्ये गावाला जाण्यासाठी तिकिट काढण्यासाठी उभे असतांना दोन अनोळखी इसमांनी कुर्ला येथे गेल्यावर जागा मिळेल असे सांगून विश्वास संपादीत केला. तसेच लोकलने रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्या सगळयांना कुर्ला येथे घेऊन गेले. कुर्ला स्थानकातून कुर्ला टर्मीनर्स येथे जाण्यासाठी रेल्वे रुळांमधून जात असतांना अंधारातून मार्ग काढतांना त्या अनोळखी इसमांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांना फोनवर संपर्क करुन बोलावून घेतले. त्यानंतर चौघा लुटारुंनी संगनमताने तक्रारदारासह चौघांना आधी लाथाबुक्यांनी मारहाण केली, तसेच धारदार चाकुने वार करत दुखापत केली. त्यानंतर त्यांच्याजवळील तीन मोबाइल, रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना घडल्याच्या गुन्ह्याची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.त्यानुसार पोलीसांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसी फुटेज तपासण्यात आले. त्यानुसार संशयितांची माहिती घेण्यात आली. पोलीसांच्या गोपनीय सूत्रांकडून (बातमीदाराकडून) फोटो दाखवले असता, ते आरोपीहे २०१८ मध्ये जबरीच्या गुन्ह्यात अटकेत होते, सध्या जामिनावर सुटले असून नागपाडा, मुंबई येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. त्यानूसार कुर्ला आणि कल्याण स्थानकात पोलीसांनी सापळा रचला. त्यामध्ये २६ मे रोजी कल्याण रेल्वे स्थानकात चोरीच्या उद्देशाने सावज हेरत असतांना पोलीसांना आढळले. त्यानूसार त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. सीसीटीव्हीत मिळालेले फुटेज आणि प्रत्यक्ष आरोपी हेच असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या चौघांना मंगळवारी अटक करण्यात आली असून बुधवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. आतापर्यंत त्यांनी चार गुन्हे कबूल केले असून तक्रारदाराच्या गुन्ह्यातील तीन मोबाइल, १६ हजार ५०० रुपये रोख रक्कम, दोन चाकू असा एकूण २९ हजार ५०० रुपयांचा ऐवज पोलीसांनी हस्तगत केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक राहुल कारभारी करीत आहेत. या गुन्ह्याचा तपासासाठी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संतोष धनवटे, तसेच शिवाजी पाटील, विजय पवार, रणजीत रासकर, गणेश गावडे, दिलीप शेळके, महेंद्र कर्डीले, वैभव जाधव, अजीम इनामदार, सचिन खंडागळे, विमल नागरगोजे आदी पोलीस कर्मचा-यांनी चांगली कामगिरी केल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :railwayरेल्वेRobberyदरोडाPoliceपोलिसArrestअटकpassengerप्रवासी