लॉकडाऊनमध्ये दारूसाठी दिवसाढवळ्या चोरट्यांनी फोडला बियर बार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 21:09 IST2020-04-21T21:05:20+5:302020-04-21T21:09:04+5:30
याप्रकरणी हॉटेल मालक संतोष घोटगे (४६) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

लॉकडाऊनमध्ये दारूसाठी दिवसाढवळ्या चोरट्यांनी फोडला बियर बार
इचलकरंजी - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन असल्याने मद्यविक्री करण्यास बंदी होती. त्यामुळे तळीरामांना मद्य मिळणे मुश्किल झाले होते. मात्र, यामुळे आता बंद असलेले बियर बार चोरट्यांनी टार्गेट केला आहे. सांगली रोडवरील पवन्स हॉटेल चोरट्यांनी फोडले आणि ४ हजार रुपयांच्या रक्कमेसह बारमधील ४ हजार रुपयांची विदेशी दारू चोरांनी लंपास केली. याप्रकरणी हॉटेल मालक संतोष घोटगे (४६) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यामध्ये ब्लेंडर स्प्राईडच्या ४ बाटल्या, टुबर्ग बिअरच्या ५ बाटल्या, मॅकडॉलच्या ४ बाटल्या, मॅकडॉल रेडरमच्या ५ बाटल्या, डीएसपी ब्लॅकच्या २ बाटल्या, बडवायझरच्या ४ बाटल्या असा दारूचा साठा आणि कॅश ड्रॉव्हरमधील ४ हजारांची रोकड असा ८०१५ चा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला.लॉकडाऊन असताना सोमवारी दिवसाढवळ्या हा चोरीचा प्रकार घडला आहे. चोरी झालेल्या हॉटेलपासून हाकेच्या अंतरापासून तपासणी नाका आहे. या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे चोरांनी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून हा चोरीचा प्रकार घडल्याने पोलीस चक्रावले आहेत.
लॉकडाऊन असूनही दिवसाढवळ्या दारू चोरीची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सांगली रोडवरील यड्राव फाट्याजवळ खोतवाडी गावाच्या हद्दीत घोटगे यांच्या मालकीचे पवन्स हॉटेल आहे. या हॉटेलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या लोखंडी शटर्सच्या दरावाजाचे कुलूप तोडण्यात आले असून आतील दरवाजाची काच फोडली. त्यातून आत प्रवेश करुन बारमधील महागडा दारूचा साठा चोरांनी पळविला.