सात वर्षे फरार दरोडेखोर अखेर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 14:52 IST2018-07-24T14:51:50+5:302018-07-24T14:52:05+5:30

सात वर्षे फरार असलेल्या एका सराईत दरोडेखोराच्या मुसक्या  पोलिसांनी आवळल्या आहेत.

robber arrested | सात वर्षे फरार दरोडेखोर अखेर गजाआड

सात वर्षे फरार दरोडेखोर अखेर गजाआड

कल्याण - सात वर्षे फरार असलेल्या एका सराईत दरोडेखोराच्या मुसक्या  पोलिसांनी आवळल्या आहेत. सात वर्षापूर्वी डोंबिवलीतील माजी आम्दारच्या घरी सशस्त्र दरोडा घालणाऱ्या चार दरोडेखोरांना पोलिसनी अटक केली होती मात्र त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला होता .या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार करत जंग जंग पछाडले होते अखेर या आरोपीला पोलिसांनी उस्मानाबाद येथून अटक केली आहे .अनिल पवार असे दरोडेखोराचे नाव असून त्याच्या विरोधात डोंबिवली ,विष्णू नगर पोलीस स्थानकात गुन्हे दखल होते .

     २०११ साली माजी आमदार हरिश्चंद्र पाटील याच्या डोंबिवली येथील राहत्या घरी अनिल पवार व त्याच्या साथीदाराणी सशस्त्र दरोडा घातला होता. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात पाच दरोडेखोराविरोधात गुन्हा दखल करत यामधील चार दरोडेखोराना अटक केली मात्र यामधील अनिल पवार हा दरोडेखोर निसटण्यात यशस्वी झाला होता. तिथपासून आजमितीला हा दरोडेखोर पोलीस यंत्रणेला हुलकावणी देत होता. फरार दरोडेखोर अनिल पवार याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके निर्माण करत त्याच्या शोधासाठी धाडली होती. याच दरम्यान अनिल उस्मानाबाद येथे कळंब येथील शिंदे वस्तीत राहत असल्याची खबर पोलीसाना मिळाली या माहितीच्या आधारे वाय. टी. तायडे, एस. के. भुजबळ, आर. एस. बनसोडे हे पोलीस थेट उस्मानाबाद गाठत अनिलला बेड्या ठोकल्या आहेत .

Web Title: robber arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.