उल्हासनगरात भरधाव टेम्पोखाली येऊन मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 21:00 IST2018-10-26T20:58:21+5:302018-10-26T21:00:14+5:30
उल्हासनगर शांतीनगर परिसरातील अंबरनाथ-कल्याण रस्त्यावरून काल रात्री 2 वाजताच्या सुमारास अक्टिव्हा मोटारसायकलवरून अजय भावनांनी जात होते. त्यावेळी कल्याणहून अंबरनाथकडे जाणाऱ्या भरधाव टेम्पोखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

उल्हासनगरात भरधाव टेम्पोखाली येऊन मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
उल्हासनगर - कॅम्प नंबर - 3 मधील शांतीनगर येथील रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोखाली येऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर शांतीनगर परिसरातील अंबरनाथ-कल्याण रस्त्यावरून काल रात्री 2 वाजताच्या सुमारास अक्टिव्हा मोटारसायकलवरून अजय भावनांनी जात होते. त्यावेळी कल्याणहून अंबरनाथकडे जाणाऱ्या भरधाव टेम्पोखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. अजय याची गाडी रस्त्यावरून स्लिप झाल्याने तो टेम्पोखाली आल्याचे बोलले जात आहे. शहरातील रस्त्याने पुन्हा एक बळी घेतल्याची टीका होत आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.