रिक्षा आढळली संशयास्पद; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह पंतनगर पोलिसांनी घेतले चौकटीला ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 20:01 IST2018-08-06T20:00:45+5:302018-08-06T20:01:26+5:30
टिटवाळ्यात मोबाईलचे दुकान फोडून पसार झालेले चोरटे फसले पंतनगर पोलिसांच्या जाळ्यात

रिक्षा आढळली संशयास्पद; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह पंतनगर पोलिसांनी घेतले चौकटीला ताब्यात
मुंबई - टिटवाळा येथील बंद असलेल्या मोबाईलचे दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्दय़ांवर घेऊन चार जणांनी टोळी शिताफीने लंपास झाली. मात्र, घाटकोपरमध्ये पाय ठेवताच पंतनगर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. आरोपींकडून सव्वा दोन लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पंतनगर पोलिसांचे एक पथक गस्त घालत असताना त्यांना रमाबाई कॉलनीजवळ आलेली एक रिक्षा संशयास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालक सुसाट पळू लागला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून रिक्षा थांबवली. त्यानंतर रिक्षात बसलेल्या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळय़ा कंपनीचे २४ नवीन मोबाईल, १५ जुने मोबाईल, २२ मोबाईल बॅटऱ्या, ३४ टेम्पर ग्लास,अँपल कंपनीचे आयपॅड असा चोरीचा मुद्देमाल सापडला. टिटवाळा येथे मोबाईलचे दुकान फोडून ही चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली.