प्रेयसी पळून गेल्याने सूड घेण्यासाठी 'तो' चोरायचा रिक्षाचालकांचे मोबाइल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 02:50 IST2020-08-26T02:50:20+5:302020-08-26T02:50:31+5:30

सीसीटीव्हीमुळे लागला ठावठिकाणा : आरोपी मूळचा गुजरातचा

Rickshaw driver's mobile to steal 'he' to get revenge for his girlfriend's escape | प्रेयसी पळून गेल्याने सूड घेण्यासाठी 'तो' चोरायचा रिक्षाचालकांचे मोबाइल

प्रेयसी पळून गेल्याने सूड घेण्यासाठी 'तो' चोरायचा रिक्षाचालकांचे मोबाइल

पुणे : प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून गेल्याने समस्त रिक्षाचालकांचा सूड घेण्याचे त्याने ठरविले. त्यामुळे तो केवळ रिक्षाचालकांचेच मोबाईल चोरायचा. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी एका तरुणाला अटक केल्यावर हे उघड झाले.

आसिफ उर्फ बोहरा अरिफभाई शेख (मूळ, रा़ अहमदाबाद) असे त्याचे नाव आहे़ याबाबत लष्कर पोलिसांनी सांगितले की, आसिफ एका तरुणीबरोबर लग्न करण्यासाठी पळून पुण्यात आला होता़ मात्र, त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या एका रिक्षाचालकावर प्रेम होते़ आसिफचे २० ते २५ हजार रुपये घेऊन ती पळून गेली़ त्याचा आसिफला मोठा धक्का बसला़ सर्व रिक्षाचालक त्याच्यादृष्टीने गुन्हेगार ठरले़ रिक्षाचालकांना त्रास देण्यासाठी तो त्यांचे मोबाईल चोरु लागला़

गर्दीत जाऊन नंतर काढायचा पळ
गर्दीच्या ठिकाणी तो रिक्षा घेऊन जात असे़ तेथे गेल्यावर आपला मोबाईल विसरला़ येथे मित्राकडे आलो आहे, त्याला बोलावून घेऊन पैसे देतो, असे सांगून तो रिक्षाचालकाचा मोबाईल घेत असत़ त्यावरुन तो फोन लावल्याचा बहाणा करीत व बोलत रिक्षापासून काही अंतर चालत जाऊन पळून जायचा.

 

Web Title: Rickshaw driver's mobile to steal 'he' to get revenge for his girlfriend's escape

टॅग्स :theftचोरी