भर गर्दीत रिक्षा चालकाने धारदार शस्त्राने केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 21:59 IST2018-11-29T21:58:40+5:302018-11-29T21:59:23+5:30

हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव मोहम्मद अब्दुल खाजा (वय ३०) असे आहे. खाजाने शाकीर कुरेशी (वय ३५) नावाच्या व्यक्तीची हत्या केली आहे.  

Rickshaw driver killed by rickshaw driver | भर गर्दीत रिक्षा चालकाने धारदार शस्त्राने केली हत्या 

भर गर्दीत रिक्षा चालकाने धारदार शस्त्राने केली हत्या 

हैदराबाद - बुधवारी संध्याकाळी हैदराबादच्या मदीना चौकावर भर गर्दीत एका रिक्षा चालकाने धारधार शस्त्राने एका व्यक्तीची हत्या केली आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी देखील अशाच प्रकारची एक घटना हैदराबादमध्ये घडली होती. दिवसाढवळ्या रस्त्यावर एका इसमाने हत्या केली होती. आता पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे हैदराबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेषत: ही घटना भर गर्दीत घडली. यावेळी रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ही घटना प्रत्यक्षपणे पाहिली. मात्र, कुणीही हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट काही लोकांनी या हत्येचा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला. हे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये वायरल होत आहेत. हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव मोहम्मद अब्दुल खाजा (वय ३०) असे आहे. खाजाने शाकीर कुरेशी (वय ३५) नावाच्या व्यक्तीची हत्या केली आहे.  

 

Web Title: Rickshaw driver killed by rickshaw driver