रिक्षाचालकाने केली दुचाकीस्वाराला लोखंडी रॉडने मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 17:46 IST2019-05-04T17:45:23+5:302019-05-04T17:46:59+5:30

दुचाकीला धक्का दिल्याबाबतचा जाब विचारल्याच्या कारणावरुन रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना दिघीतील दत्तनगर येथे शुक्रवारी घडली. 

Rickshaw driver injured two-wheeler driver with iron rods | रिक्षाचालकाने केली दुचाकीस्वाराला लोखंडी रॉडने मारहाण 

रिक्षाचालकाने केली दुचाकीस्वाराला लोखंडी रॉडने मारहाण 

पिंपरी : दुचाकीला धक्का दिल्याबाबतचा जाब विचारल्याच्या कारणावरुन रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना दिघीतील दत्तनगर येथे शुक्रवारी घडली. 


    विजय अशोक चौगुले (वय २८, रा. चोविसावाडी, चरहोली बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनोळखी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दत्तनगर येथील बसथांब्यासमोरील रस्त्यावर (एमएच १४, सीयु ०३०७) या क्रमांकाच्या रिक्षाचालकाने त्याची रिक्षा वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करुन इंडिकेटर न देता अचानक उजवीकडे वळविली. या दरम्यान चौगुले यांच्या दुचाकीचा धक्का रिक्षाला बसल्याने ते खाली पडले. याबाबतचा जाब चौगुले यांनी रिक्षाचालकाला विचारला असता त्याने चौगुले यांना धमकी दिली. तसेच रिक्षाच्या सीटखालून लोखंडी रॉड काढून त्यांच्या डोक्यात मारला. यामध्ये चौगुले जखमी झाले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Rickshaw driver injured two-wheeler driver with iron rods