रिक्षाचे भाडे मागितल्याने रिक्षाचालक तरुणावर चाकूने हल्ला, चंदनसार येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 00:14 IST2022-08-21T00:12:04+5:302022-08-21T00:14:27+5:30
शुक्रवारी दुपारी विरारच्या चंदनसार येथे ही घटना घडली. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे.

रिक्षाचे भाडे मागितल्याने रिक्षाचालक तरुणावर चाकूने हल्ला, चंदनसार येथील घटना
मंगेश कराळे -
नालासोपारा - रिक्षाचे भाडे मागितल्याने राग मनात धरून रिक्षाचालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी विरारच्या चंदनसार येथे ही घटना घडली. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. जखमी रिक्षाचालकाला रिद्धीसिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे.
चंदनसार रोडवरील कातकरी पाडा येथे शहजाव शेख (२६) हा तरुण राहत असून तो रिक्षा चालवतो. रिक्षा पंक्चर असल्याने ते काढण्यासाठी जात असताना त्याच्या ओळखीचे दोघे आले व तांदूळ बाजार येथे सोडण्यासाठी सांगितले. शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास तांदूळ बाजार येथे सोडल्यानंतर रिक्षा चालकाने भाडे मागितले. याच गोष्टींचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या खिशातून चाकू काढून शहजाव याच्या डाव्या गालावर मारून गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी सलिम शेख नावाच्या आरोपीला अटक केले असून पोलीस पुढील तपास करत आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतला सांगितले.