तरुणीला मारहाण करणारा रिक्षाचालक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 21:53 IST2019-08-08T21:52:50+5:302019-08-08T21:53:51+5:30

रिक्षाचालकाला नालासोपारा पोलिसांनी नालासोपाऱ्यातून बेड्या ठोकल्या आहेत.

Rickshaw driver arrested for beating woman | तरुणीला मारहाण करणारा रिक्षाचालक अटकेत

तरुणीला मारहाण करणारा रिक्षाचालक अटकेत

ठळक मुद्देपुरकान शेख (२४) असं अटक रिक्षाचालकाचं नाव असून तो नालासोपाऱ्यात टाकी पाडा येथे राहणारा आहे.  आरोपी आज त्याच्या राहत्या घरी नालासोपारा येथे आल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली. 

नालासोपारा - शहरात वाढत चाललेल्या अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट हा प्रश्न ऐरणीवर असताना काही रिक्षा चालकांची दादागिरीमुळे अनेक ठिकाणी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही रिक्षाचालकांनी दादागिरी करत प्रवाशांना मारहाण केल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. असाच प्रकार शनिवारी सकाळी नालासोपारा पश्चिमेकडील परिसरात घडला असून २५ वर्षीय तरुणीला शिविगाळ करून रस्त्यावर पाडून लाथाबुक्यांनी मारहाण करत विनयभंगकेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. जखमी तरुणीच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रिक्षाचालकाला नालासोपारा पोलिसांनी नालासोपाऱ्यातून बेड्या ठोकल्या आहेत. पुरकान शेख (२४) असं अटक रिक्षाचालकाचं नाव असून तो नालासोपाऱ्यात टाकी पाडा येथे राहणारा आहे.  

नालासोपारा पश्चिमेकडील समेळ पाडा परिसरात राहणारी २५ वर्षीय तरुणी शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घरी जाण्यासाठी ओव्हरब्रिजच्या खाली रिक्षा स्टँडवर येऊन रिक्षात बसली. बसलेल्या रिक्षात तरुणी बसल्यावर जोरात आवाजाने टेप लावण्यात आल्यावर तरुणीने आवाज कमी करण्यास सांगितले. मात्र, रिक्षा चालकाने त्या एकट्या तरुणीसोबत हुज्जत घालून टेपचा आवाज अजून वाढवला. पीडित तरुणीला शिविगाळ केल्यानंतर जाब विचारल्यावर रागाच्या भरात रिक्षाचालकाने मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर तिला रस्त्यावर आडवे पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या तरुणीने रिक्षाचा नंबर घेऊन नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर आरोपी रिक्षाचालकाविरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांना आरोपी कधी माहीम तर कधी मुंब्रा येथे असल्याची माहिती मिळत होती. मात्र, आरोपी आज त्याच्या राहत्या घरी नालासोपारा येथे आल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली. 

Web Title: Rickshaw driver arrested for beating woman