शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

रियाची भायखळा तुरुंगात रवानगी, शोविकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 16:53 IST

रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाला जामीन मिळवून देण्यासाठी सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला आहे. उद्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 

ठळक मुद्देमंगळवारी रियाला एनसीबीकडून अटक झाली आणि व्हर्च्युअल सुनावणीच्या माध्यमातून एनसीबीने मागितल्याप्रमाणे १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. एनसीबीने स्पष्ट केले आहे की, ड्रग्ज सिंडिकेट उघडकीस येईल. शोविक आणि रियाविरूद्धची कारवाई या दिशेने पहिले पाऊल मानले जात आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास रिया भायखळा कारागृहात दाखल झाली. मंगळवारी रियाला एनसीबीकडून अटक झाली आणि व्हर्च्युअल सुनावणीच्या माध्यमातून एनसीबीने मागितल्याप्रमाणे १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे रियाची आजची रात्र जेलमध्येच काढावी लागणार आहे. तर तिचा भाऊ शोविकला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाला जामीन मिळवून देण्यासाठी सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला आहे. उद्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात चक्रवर्ती कुटुंबीय वाईट रीतीने गुंतले गेले आहेत. एकीकडे शोविक चक्रवर्ती यापूर्वीच अटक झाली होती, तर रियालाही मंगळवारी एनसीबीने अटक केली होती. अभिनेत्रीचा त्रास वाढला कारण कोर्टानेही तिची जामीन याचिका रद्द केली. अशा परिस्थितीत रियाला आता 14 दिवस तुरूंगात राहावे लागेल. त्यानंतर रियाच्या वकिलांनी जामीन अर्ज सेशन्स कोर्टात दाखल केला आहे. 

रियाला जामीन मिळेल की तुरूंगात जाईल?आज रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी पुन्हा एकदा सेशन्स कोर्टात जामीन याचिका दाखल केली आहे. त्यांना आशा आहे की, रिया अजूनही तुरूंगात जाण्यापासून वाचू शकेल. पण सतीश एनसीबी कार्यालयात पोहोचले तेव्हा त्याच्या हातात एक बॅगही होती. ती बॅग फक्त रियासाठीच असल्याचे सांगण्यात येत आहे. रियाला जामीन मिळाला नाही तर तिच्या तुरूंगात राहण्याची पूर्ण तयारी केली गेली आहे. कोर्टाचा आदेश अद्याप आलेला नसला तरी रिया भायखळा तुरुंगात पोहोचली आहे. तिला त्याच जेलमध्ये 14 दिवस घालवावे लागतील.शोविकवर मोठा निर्णयरिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असून इतरांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  बुधवार हा रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीसाठीसुद्धा खूप महत्वाचा होता. बुधवारी एनसीबीचा रिमांड संपला, अशा परिस्थितीत शोविकला कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

एनसीबीच्या या मोठ्या कारवाईनंतर बॉलिवूडचीही झोप उडाली आहे. जेव्हापासून अशी बातमी समोर आली आहे की एनसीबीला ड्रग पार्टीमध्ये भाग घेणार्‍या 25 सेलिब्रिटींची यादी देण्यात आली आहे तेव्हापासून अनेक कलाकारांची झोप उडाली आहे. एनसीबीने स्पष्ट केले आहे की, ड्रग्ज सिंडिकेट उघडकीस येईल. शोविक आणि रियाविरूद्धची कारवाई या दिशेने पहिले पाऊल मानले जात आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

 

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

 

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याSessions Courtसत्र न्यायालयadvocateवकिलjailतुरुंग