सेवानिवृत्त शिक्षकांनी दोन अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; भुसावळमध्ये उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 11:42 IST2022-03-08T11:30:44+5:302022-03-08T11:42:41+5:30
बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये 376, 376 पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.

सेवानिवृत्त शिक्षकांनी दोन अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; भुसावळमध्ये उडाली खळबळ
जळगाव- खाजगी क्लास घेणाऱ्या सेवानिवृत्त एका शिक्षकाने दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने भुसावळ शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या खाजगी क्लास घेणार या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणाबाबतचा तपास पोलीस करत आहे, अशी माहिती भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे.
काल बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये 376, 376 पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. अल्पवयीन मुलीसोबत खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केलेला आहे. त्यामध्ये पोलीस सविस्तर तपास करत आहेत. सदर खाजगी शिक्षक हे शहरातील एका प्रथितयश संस्थेमधून किंवा शाळेमधून सेवानिवृत्त झालेले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सदर आरोपी शिक्षकाने इतर दोन-तीन ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये रिटायरमेंटनंतर काम केले आहे. या संस्थांमध्ये देखील या प्रकारची घटना घडली आहे का, याची चौकशी देखील आता पोलीस करत आहेत. सदर सेवानिवृत्त शिक्षक यांना अटक केलेले आहे आणि या गुन्ह्याचा तपास करत आहेत, अशी माहिती सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
जळगाव- खाजगी क्लास घेणाऱ्या सेवानिवृत्त एका शिक्षकाने दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने भुसावळ शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. pic.twitter.com/cPWe9wS9iL
— Lokmat (@lokmat) March 8, 2022