Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:54 IST2026-04-07T12:53:51+5:302026-04-07T12:54:50+5:30

हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे ज्याने संपूर्ण परिसर हादरवून सोडला आहे.

retired army man arrested for tying and assaulting 4 year old girl over guava in himachal | Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण

Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण

हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे ज्याने संपूर्ण परिसर हादरवून सोडला आहे. एका व्यक्तीवर असा आरोप आहे की, त्याने आपल्या बागेतून फक्त एक पेरू तोडल्याच्या गुन्ह्यासाठी चार वर्षांच्या चिमुकलीला दोरीने बांधलं आणि तिला मारहाण केली. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांचा संताप अनावर झाला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाल्यावर ही घटना समोर आली आहे. व्हिडिओमध्ये ती लहान मुलगी रडताना आणि गयावया करताना दिसत आहे, ती म्हणतेय, “अंकल, मला वाचवा”. मुलीची ही हतबलता तिच्यावर झालेल्या अत्याचाराची भीषणता स्पष्टपणे मांडत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुलीचे हात-पाय दोरीने बांधले

मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीने मुलीला आपल्या बागेत फळ तोडताना पकडलं होतं. रागाच्या भरात त्याने मुलीचे हात-पाय दोरीने बांधले आणि तिला आपल्या घराच्या आत नेऊन मारहाण केली. घराच्या आतून मुलीचा सतत येणारा ओरडण्याचा आवाज तिची वेदना दर्शवत होता, परंतु आरोपीला तिची दया आली नाही.

मुलगी खूप रडत होती

या घटनेदरम्यान ऊना येथील बहडाला गावचे रहिवासी रोहित जायसवाल तिथून जात होते. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांना काहीतरी संशयास्पद वाटले. त्यानंतर जेव्हा ते घराच्या आत गेले, तेव्हा त्यांना दिसलं की लहान मुलीला अत्यंत निर्दयीपणे बांधलं होतं आणि ती खूप रडत होती. त्यांनी तातडीने आरोपीला जाब विचारला, पोलीस आणि चाईल्ड हेल्पलाईनला माहिती दिली आणि संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
 

Web Title : गुस्सा: अमरूद चुराने पर आदमी ने 4 साल की बच्ची को बांधकर पीटा।

Web Summary : हिमाचल प्रदेश में एक चौंकाने वाली घटना: एक आदमी ने कथित तौर पर अपने बाग से अमरूद चुराने के लिए चार साल की बच्ची को बांधकर पीटा। एक राहगीर ने हस्तक्षेप किया, पुलिस और चाइल्ड हेल्पलाइन को सतर्क किया। जांच चल रही है।

Web Title : Outrage: Man ties, beats 4-year-old girl for stealing guava.

Web Summary : A shocking incident in Himachal Pradesh: a man allegedly tied and beat a four-year-old girl for stealing a guava from his orchard. A passerby intervened, alerted police and child helpline. Investigation is underway.