मतदान करताना काढले फोटो आणि केले वायरल; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 15:38 IST2019-05-01T15:37:51+5:302019-05-01T15:38:48+5:30
याप्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मतदान करताना काढले फोटो आणि केले वायरल; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
नंदुरबार - लोकसभा निवडणुकीत मतदान करतानाचा फोटो काढून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी नंदुरबार पोलिसात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील अभिनव विद्यालयातील बुथ क्रमांक 3/294 मध्ये हा प्रकार घडला आहे. सायबर सेल आणि निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. मतदान करताना अज्ञातांनी फोटो काढून ते सोशल मीडियावर वायरल केले होते. याप्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.