वृद्ध आईला घराबाहेर काढल्याने मुलं, सुनेवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 21:58 IST2019-10-20T21:50:52+5:302019-10-20T21:58:49+5:30
पालघर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल

वृद्ध आईला घराबाहेर काढल्याने मुलं, सुनेवर गुन्हा दाखल
नालासोपारा - पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या 80 वर्षीय वृद्ध आईला गुरुवारी दोन सख्या मुलांनी व सुनेने घराबाहेर काढून तिचा परात्याग केल्याची खळबळजनक घटना घडल्याने तुळींज पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. असा गुन्हा दाखल झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील पहिलीच गुन्हा असल्याचे बोलले जात आहे.
नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन सिटीमधील बिल्डिंग नंबर 81 मधील सदनिका नंबर 201 मध्ये राहणाऱ्या सुरेखा सोनू आंबेकर (80) या वृद्ध आईचा मुलगा संजय सोनू आंबेकर (50), मुलगा धर्मराज सोनू आंबेकर (45) आणि सून शुभांगी धर्मराज आंबेकर (40) हे सांभाळ करत होते पण गुरुवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून शिविगाळ, दमदाटी करून तू फुकटचे खाते, तू आमच्या घरातून निघून जा असे बोलून घराच्या बाहेर काढून घराचा दरवाजा लावून घेत आईला घरात घेण्यास मज्जाव करत दोन्ही मुले आणि सुनेने वृद्धपकाळात उघड्यावर टाकून तिचा परित्याग केला म्हणून निराश झालेल्या आईने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन दुःखद कहाणी सांगितल्यावर पोलिसांनी तिघांवर जेष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण कल्याण अधिनियम 2007 चे कलम 24 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.