शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नात्यातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या भामट्याला नातेवाईकांनी दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 16:27 IST

Sexually Abuse :१४ मे रोजी तो नागपुरात आला होता. मुक्कामी असताना त्याने आपल्या चुलत बहिणीच्या मुलीचा तसेच तिच्या सोबत आणखी एका मुलीसोबत लज्जास्पद वर्तन केले.

ठळक मुद्देभम विश्वेश्वर धुंडे (वय २९) असे आरोपीचे नाव असून तो मध्यप्रदेशातील सौंसर येथील रहिवासी आहे.

नागपूर : नात्यातील मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या भामट्याला बेदम चोप देऊन नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात आणले. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. बुधवारी दुपारी लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. शुभम विश्वेश्वर धुंडे (वय २९) असे आरोपीचे नाव असून तो मध्यप्रदेशातील सौंसर येथील रहिवासी आहे. आरोपी धुंडेचे सौंसर येथे हॉटेल आणि ढाबा आहे. लकडगंजमध्ये त्याची चुलतबहिण, जावई आणि इतर नातेवाईक राहतात. त्यामुळे त्याचे नागपुरात नेहमी येणे जाणे आहे.

१४ मे रोजी तो नागपुरात आला होता. मुक्कामी असताना त्याने आपल्या चुलत बहिणीच्या मुलीचा तसेच तिच्या सोबत आणखी एका मुलीसोबत लज्जास्पद वर्तन केले. नंतर तिला मोबाईलही विकत घेऊन दिला. त्यानंतर तो या दोन्ही मुलीच्या नेहमी ऑनलाइन संपर्कात होता. अश्लील व्हिडिओ, फोटो पाठविणे, चॅट करणे असे प्रकार सुरू झाले. १३ जूनला मुलीकडे आईला मोबाईल दिसला. महागडा मोबाईल तुझ्याकडे कसा आला, अशी विचारणा केली असता तिने काकूच्या भावाने मोबाईल घेऊन दिल्याचे सांगितले. त्यानंतर मोबाईलची तपासणी केली असता त्यात आक्षेपार्ह प्रकार आढळले. त्यामुळे नातेवाईकांनी दोन्ही मुलींना खोदून खोदून विचारले. तेव्हा हा गैरप्रकार उघड झाला. नातेवाईकांनी आरोपी धुंडेला नागपुरात बोलवले. बुधवारी तो आला असता त्याला यासंबंधाने विचारपूस केली. त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. दोन्ही मुलींना समोर उभे करून मोबाईल दाखवला असता तो निरुत्तर झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी त्याची बेदम धुलाई केली आणि त्याला चोपतच पोलीस ठाण्यात आणले. ठाणेदार पराग पोटे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार कलम ३५४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. 

कपिलनगरातही विनयभंग 

कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आरोपी मीलन शेषराव सहारे (वय ४५) याने शेजारच्या २१ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले. २१ जून ते १० जूनच्या दरम्यान हा प्रकार घडला. तरुणीने बुधवारी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसnagpurनागपूरArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदा