संतापजनक... ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या चिमुकलीचे महिला शिक्षिकेने केले लैंगिक शोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 21:39 IST2018-09-26T21:38:25+5:302018-09-26T21:39:37+5:30

पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Regrettably ... Sexual harassment by a female teacher of Junior Keegit learners | संतापजनक... ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या चिमुकलीचे महिला शिक्षिकेने केले लैंगिक शोषण 

संतापजनक... ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या चिमुकलीचे महिला शिक्षिकेने केले लैंगिक शोषण 

मुंबई - कांदिवलीतील एका शाळेत ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ वर्षाच्या चिमुकलीने घरी पालकांनी खोदून खोदून शिताफीने विचारल्यानंतर शाळेत महिला शिक्षिका शरीराच्या काही भागाला स्पर्श करते असे पालकांना सांगितले. त्यानंतर संबंधित पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना हा प्रकार सांगितला. नंतर पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Regrettably ... Sexual harassment by a female teacher of Junior Keegit learners