धक्कादायक! हत्या प्रकरणातील आरोपी झाला पोलीस कॉन्स्टेबल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 20:58 IST2020-02-04T20:50:56+5:302020-02-04T20:58:28+5:30

तो सध्या अल्मोरा पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे.

Recruited as Police constable accused in murder case and... | धक्कादायक! हत्या प्रकरणातील आरोपी झाला पोलीस कॉन्स्टेबल अन्...

धक्कादायक! हत्या प्रकरणातील आरोपी झाला पोलीस कॉन्स्टेबल अन्...

ठळक मुद्देमुकेश कुमार असे आरोपीचे नाव असून तो सध्या अल्मोरा पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे.उत्तराखंड येथील किच्चाच्या सेहडोरा गावाच्या मूळ पत्त्याच्या आधारावर पोलीस भरती झाला. 

रुद्रपूर - उत्तर प्रदेशच्या बरेली येथे १९९७ सालच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेला एक आरोपी उत्तराखंड पोलीस दलात गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. गेल्या १९ वर्षांपासून तो वेगवगळ्या भागात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करत आहे. मुकेश कुमार असे आरोपीचे नाव असून तो सध्या अल्मोरा पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे.
 

भा. दं. वि. कलम ४२० अन्वये पंतनगर पोलीस ठाण्यात मुकेश कुमारविरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला  आहे. फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पंतनगर एसएचओ अशोक कुमार यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, मुकेश हा १९९७ साली उत्तर प्रदेशातील बरेली येथील खून प्रकरणात सामील होता. तरीदेखील चार वर्षांनी म्हणजेच २००१ साली तो पोलीस भरती झाला. उत्तराखंड येथील किच्चाच्या सेहडोरा गावाच्या मूळ पत्त्याच्या आधारावर पोलीस भरती झाला. 

Web Title: Recruited as Police constable accused in murder case and...