पती अनेक स्त्रियांशी बोलत असल्याचे सापडले 'रेकॉर्ड'; डॉक्टर पत्नीची पोलीस ठाण्यात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 19:48 IST2022-12-25T19:45:28+5:302022-12-25T19:48:45+5:30
विशेष म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पत्नीने तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दिली.

पती अनेक स्त्रियांशी बोलत असल्याचे सापडले 'रेकॉर्ड'; डॉक्टर पत्नीची पोलीस ठाण्यात धाव
सातारा : पती अनेक स्त्रीयांसोबत बोलत असल्याचे त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड सापडले. यानंतर पती पत्नीमध्ये वाद टोकाला गेला. विशेष म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पत्नीने तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहिता ही डॉक्टर आहे. त्यांच्या पतीने त्यांचा चारित्र्याच्या संशयावरून वारंवार छळ केला. तसेच गरोदर असताना देखील काळजी न घेता मानसिक छळ केला. त्यांचे पती अनेक स्त्रीयांसोबत बोलत असल्याचे त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड सापडले. यानंतर वाद टोकाला गेले.
या प्रकारानंतर डॉक्टर विवाहितेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित महिला डॉक्टरच्या पतीवर गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार पोळ हे अधिक तपास करीत आहेत.