एवढ्याशा कारणासाठी 'त्यानं' रचली पत्नीची खोटी मर्डर स्टोरी; 7 कंपन्यांकडून हडपले 35 कोटी अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 05:17 PM2022-01-12T17:17:39+5:302022-01-12T17:21:20+5:30

Bogus Murder Story : आता तब्बल ५ वर्षांनंतर आरोपी डेंटिस्ट पतीचा खोटेपणा उघड झाला आहे. आरोपी डेंटिस्ट पती पेनसिल्व्हेनिया येथील रहिवासी आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

For this reason, he fabricated his wife's false murder story; 35 crore duped from 7 companies ... | एवढ्याशा कारणासाठी 'त्यानं' रचली पत्नीची खोटी मर्डर स्टोरी; 7 कंपन्यांकडून हडपले 35 कोटी अन् मग...

एवढ्याशा कारणासाठी 'त्यानं' रचली पत्नीची खोटी मर्डर स्टोरी; 7 कंपन्यांकडून हडपले 35 कोटी अन् मग...

Next

व्यवसायाने दाताचा डॉक्टर असलेल्या पतीने विमा कंपनीसमोर एक खोडसाळ कहाणी रचली की, त्याच्या पत्नीने चुकून स्वतःवर गोळी झाडली. यानंतर त्याची रचलेली कहाणी विमा कंपनीसह पोलिसांनी खरी असल्यासारखी वाटलं. त्यानंतर त्याला विमा कंपनीने पत्नीच्या पॉलिसीचे ४.८ मिलियन डॉलर (सुमारे ३५ कोटी रुपये) दिले. मात्र, आता तब्बल ५ वर्षांनंतर आरोपी डेंटिस्ट पतीचा खोटेपणा उघड झाला आहे. आरोपी डेंटिस्ट पती पेनसिल्व्हेनिया येथील रहिवासी आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, पती लॉरेन्स रुडॉल्फ (67) याच्यावर 2016 मध्ये पत्नी बियांकाची हत्या केल्याचा आरोप आहे. लॉरेन्सने सांगितले की, त्याच्या पत्नीने चुकून स्वत:वर गोळी झाडली होती. 2016 मध्ये तो आपल्या पत्नीसोबत 'आफ्रिकन सफारी'साठी झांबियाला गेला होता. तो परतणार होता त्याच दिवशी पत्नीने स्वतःवर अनावधानाने गोळ्या झाडल्या.

झांबिया पोलिसांनीही गोळीबार हा कथित अपघात मानला आणि लॉरेन्सच्या रचलेल्या खोट्या कहाणीवर विश्वास ठेवला. 1982 मध्ये लग्न झाल्यापासून दोघेही सतत सफारीला जात असत. वास्तविक, या प्रकरणाचा तपास एफबीआयने सुरू केला होता. 2016 मध्ये, बियांकाच्या मित्राने एफबीआयला कॉल केला आणि माहिती दिली की, त्यांना या मृत्यूबाबत संशय आहे. त्याच मित्राने सांगितले की, लग्नानंतर दोघेही आनंदी नव्हते, परंतु लॉरेन्सला घटस्फोट घ्यायचा नव्हता. जेणेकरून त्याला पोटगी द्यावी लागेल आणि त्याचे पैसे कमी होऊ नयेत. दोघांना दोन मुलेही आहेत. त्यापैकी एक मुलगी डेंटिस्टसोबत लॉरियसच्या डेंटल क्लिनिकमध्ये काम करते.

पत्नीच्या हत्येनंतर लॉरेन्सविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीत त्याने सात वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडून सुमारे 35 कोटी रुपये हडप केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, नुकतेच लॉरेन्सचे हे कृत्य उघडकीस आले असून पॉलिसीच्या पैशासाठी त्याने हे सर्व केल्याचे उघड झाले आहे.

माजी नौसैनिक बनला हैवान, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ५ महिलांवर केला बलात्कार

पत्नीच्या मृत्यूनंतर मैत्रिणीची एन्ट्री

एफबीआय एजंटने सांगितले की, पत्नीच्या अंतिम संस्कारानंतर आरोपी डेंटिस्टने विमानाचे तिकीट बुक केले. मात्र त्याने हे तिकीट रद्द केले, त्यानंतर दुसऱ्या महिलेच्या नावाने तिकीट बुक केले. तिची आणि त्याची  लॉस वेगासमध्ये भेट झाली. त्याच वेळी, ज्या महिलेसाठी डेंटिस्टने तिकीट रद्द केले होते, ती मेक्सिकोमध्ये त्याच्या पत्नीच्या मृत्यूपूर्वी भेटली होती.



अशा प्रकारे एफबीआयने तपास केला

एफबीआयने तपासादरम्यान झांबियातील टूर गाईडशीही बातचीत केली. त्यावेळी गाईडने सांगितले की, लॉरेन्सने अधिकाऱ्यांना पैसे देऊन आपल्या पत्नीवर अंत्यसंस्कार केले. त्याचवेळी  कोलोराडोमध्ये उपस्थित असलेल्या वैद्यकीय तज्ञाने बियांकाचा फोटो पाहून सांगितले की, स्वतः शूट करणे कठीण आहे. यानंतर डिसेंबर 2021 मध्ये आरोपी डेंटिस्टला अटक करण्यात आली होती. सध्या डेंटिस्ट पतीला डेन्व्हर, कोलोरॅडो येथून अटक करण्यात आली आहे. त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

Web Title: For this reason, he fabricated his wife's false murder story; 35 crore duped from 7 companies ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.