रवी पुजारीने ५ कोटीच्या खंडणीसाठी डॉक्टरला धमकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 21:27 IST2018-10-10T21:26:57+5:302018-10-10T21:27:35+5:30
याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात डाॅक्टरने तक्रार नोंदवली असून खंडणी विरोधी पथकाचे पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

रवी पुजारीने ५ कोटीच्या खंडणीसाठी डॉक्टरला धमकावले
मुंबई - कुख्यात गुंड रवी पुजारीने चेंबूरमधील एका प्रसिद्ध डाॅक्टरला खंडणीसाठी धमकाविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पुजारीने या डाॅक्टरकडे पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली असून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारदार डाॅक्टरने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात डाॅक्टरने तक्रार नोंदवली असून खंडणी विरोधी पथकाचे पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.